मी जर साडी नेसली तर मला ‘संघी’, ‘भक्त’ ‘हिंदुत्त्ववादी’ आयकॉन ठरवले जाईल का? असा प्रश्न ट्विट करत अभिनेत्री रविना टंडनने खळबळ उडवून दिली आहे. अभिनेत्री रविना टंडनने तिच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर गुलाबी आणि नीळ्या रंगातल्या साडीतले फोटो पोस्ट केले आहेत. त्याखाली तिने हा प्रश्न ट्विट केला आहे. या फोटोमधला रविना टंडनचा अंदाज अर्थातच घायाळ करणारा आहे. मला साडी नेसायला आवडते.. मग मी कोणत्याही लेबलचा विचार करायला हवाय का? या तिच्या ट्विटवर अनेक नेटिझन्सनी टीका केली आहे. तर अनेकांनी तिचे समर्थनही केले आहे. रविना तू साडीमध्ये सुंदर दिसतेस कोणाच्याही प्रतिक्रियेचा विचार न करता बिनधास्तपणे साडी नेस असा सल्ला तिला अनेकांनी दिला आहे. तर रविना टंडन ही साडीला अकारण राजकीय रंग देते आहे अशी टीका करत तिच्या या प्रश्नाला अनेक नेटिझन्सने झोडपलेही आहे.

खरेतर नुकतेच सोशल अकाऊंटवर अभिनेत्री फातिमा शेखने तिचे बिकीनीमधले फोटो शेअर केले होते. ज्यानंतर रमझानच्या महिन्यात असे फोटो घालू नकोस असा सल्ला तिला अनेक मुस्लिम संघटनांनी दिला होता. तसेच या फोटोजवरी सडकून टीका झाली होती. आता रविना टंडनने साडी नेसलेले फोटो टाकून माझ्यावर हिंदुत्त्ववादी असे लेबल लावले जाणार नाही ना? साडी हा माझा आवडता पोशाख आहे असे ट्विट केले आहे. यामुळे रविना टंडनच्या ट्विटर अकाऊंटची चर्चा रंगताना दिसते आहे. बघायला गेल्यास या फोटोंमध्ये विशेष काहीही नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रविना टंडनच्या सौंदर्यात भर घालणारेच हे फोटो आहेत. मात्र रविना टंडनने त्याच्या खाली ज्या ओळी लिहील्या आहेत त्यामुळे अनेक नेटिझन्सच्या उलटसुलट प्रतिक्रिया बघायला मिळत आहेत. कोणत्याही प्रकारचे कपडे घालण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला असले पाहिजे. त्यावरून टीका होण्याची गरज नाही. मात्र आपण कसे लेबल लावून मोकळे होतो हेच रविनाला आपल्या ट्विटमधून सांगायचे आहे असे दिसते आहे. रविनाचा हे धाडस चांगले आहे असेच म्हणावे लागेल. पण तिच्या ट्विटमधल्या ओळींमुळे टीकाही होते आहे आणि तिचे कौतुकही.. रविना हे काही फार गांभिर्याने घेईल असेही नाही. पण एक नक्की की या सगळ्यामुळे रविनाच्या नावाची चर्चा रंगताना दिसते आहे.