शायरीवर पुस्तक लिहिणारे रविंद्र जैन हे पहिले संगीतकार ठरले आहेत. त्यांनी लिहिलेल्या ‘दिल की नजर से’ या शायरीवरील पुस्तकाचे त्यांच्या ७०व्या वाढदिवशी अनावरण करण्यात आले. हा कार्यक्रम जुहूच्या इस्कॉन मंदिरात पार पडला. यावेळी चित्रपट आणि संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी अभिनेत्री रेखा आणि हेमा मालिनी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. रितू जौहरी, शोमा घेष आणि कविता सेठ यांनी आपल्या सुमधुर आवाजात गझल गाऊन कार्यक्रमाची रंगत वाढवली. यानंतर रेखा आणि हेमा मालिनीच्या हस्ते ‘दिल की नजर से’ या रविंद्र जैन लिखित गझलवरील पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. पुस्तकाच्या अनावरणानंतर रविंद्र जैन यांच्या वढदिवसाप्रित्यर्थ पुस्तकाच्या आकारातील मोठा केक कापण्यात आला. यावेळी अभिजीत, धर्मेश तिवारी, सुरेश वाडकर, अरुण गोविल, शैलेश लोढा, कविता कृष्णमूर्ति, साधना सरगम, धीरज कुमार, मुन्ना अजीज इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते.