बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग याचा चित्रपट ‘बेफिक्रे’ने प्रदर्शित होण्यापूर्वीच इतिहास रचल्यानंतर या चित्रपटात मिळालेल्या संधीचे गुपित रणवीरने उलगडले. रणवीरने बेफ्रिक्रे च्या ‘यू अॅण्ड आय’ या गीताच्या प्रदर्शनावेळी अदित्यसोबत काम करण्याची संधी कशी मिळाली याचा खुलासा केला. अदित्य चोप्राला माझ्यासोबत चित्रपटात काम करायचे होते. चित्रपटाचे कथानक लिहण्याचे सुरु केल्यापासून मी अदित्य सोबत होतो. त्यामुळेच मला या चित्रपटात संधी मिळाली.  माझ्यासाठी मार्गदर्शक असणाऱ्या अदित्यने  आपल्या चित्रपटामध्ये मला  निवडल्याने मी आनंदी असल्याचे रणवीर म्हणाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रणवीरने यापूर्वी ‘लेडीज वर्सिज रिकी बहल’ या चित्रपटात आदित्य चोप्रा सोबत काम केले आहे. आदित्य ने या चित्रपटाची कथा लिहली होती. बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांच्या व्यतिरिक्त रणवीर एकमेव कलाकार आहे की ज्याला आदित्य चोप्रा आणि संजय भन्साली यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. महानायक आणि बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांपैकी एक असलेल्या शाहरुख यांनी काम केलेल्या दिग्दर्शकासोबत काम करण्याची संधी मिळणे भाग्यशाली असल्याचे रणवीरने म्हटले आहे.

‘बेफिक्रे’तील चुंबनदृश्ये आधीच चर्चेचा विषय बनली आहेत. या चित्रपटातील ट्रेलरमध्ये १३ चुंबनदृश्ये दाखविण्यात आली आहेत. विशेष म्हणजे ट्रेलरमध्ये १३ चुंबनदृश्ये असूनही सेन्सॉर बोर्डाने अगदी मोठ्या मनाने त्याला यूए प्रमाणपत्र दिले आहे. रणवीरचा आगामी चित्रपट ‘बेफिक्रे’ ९ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणवीरसह वाणी कपूर मुख्य भूमिकेत दिसेल. या चित्रपटाचे चित्रीकरण ५० दिवसांत पॅरिस आणि मुंबई येथे करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reason why ranveer singh was first choice of aditya chopra in befikre
First published on: 17-11-2016 at 23:14 IST