बॉलिवूडच्या एव्हर ग्रीन अभिनेत्री म्हणून रेखा ओळखल्या जातात. रेखा त्यांच्या बेधडक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. बऱ्याचवेळा त्यांना यामुळे ट्रोल केले गेले होते. याचा त्यांच्यावर खूप परिणाम झाला होता. सुरुवातीला त्यांना या सर्व गोष्टी कळत नव्हत्या. काही वेळानंतर सगळ्याच गोष्टीवर आपलं मत मांडायचं नाही असं त्यांनी ठरवलं आणि बऱ्याच गोष्टींवर मत मांडण्यावर त्यांनी दुर्लक्ष केलं.

यासिर उस्मान यांनी रेखा यांच्या आयुष्यावर एक पुस्तक लिहिलं होतं. या पुस्तकात त्यांनी सांगितलं होतं की एका मुलाखतीत रेखा म्हणाल्या होत्या, “तुम्ही एका माणसाच्या जवळ जात आहात. पण तुम्ही जाऊ शकत नाही. कारण शारीरिक संबंधाशिवाय तुम्ही कोणच्या जवळ जाऊ शकत नाही. ” तर लग्नाआधी शारीरिक ठेवण्यात काहीही हरकत नाही असे त्या म्हणाल्या होत्या.

आणखी वाचा : आमिरसोबत लग्नाच्या चर्चांवर अखेर फातिमाने सोडलं मौन म्हणाली…

त्यावेळी रेखा यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे त्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. यानंतर त्यांनी कोणत्याही विषयी वक्तव्य केलं तरी त्या ट्रोल केले जात होते. पण या सगळ्यामुळे त्यांना काहीही फरक पडला नाही असे त्या म्हणाल्या होत्या.

आणखी वाचा : “आमच्याबद्दल खोटं पसरवून…”, अन्नपूर्णा विठ्ठल यांच्या आरोपावर अखेर सुनील बर्वेंनी सोडले मौन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रेखा पुढे म्हणाल्या, त्यांना सुंदर गोष्टी प्रचंड आवडतात. फावल्या वेळेत बागकाम, मेकअप आणि घर सजवायला त्यांना आवडते. एवढचं काय तर अनेक लोक त्यांना सल्ले देतात मात्र, शेवटी त्यांना जे आवडतं तेच त्या करतात.