धर्मेंद्र, सनी देओल आणि बॉबी देओल यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘यमला पगला दिवाना’ हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर चांगलाच गाजला. चित्रपटाला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर त्याच्या सिक्वलचीदेखील निर्मिती करण्यात आली. आता त्याचा तिसरा भाग म्हणजेच ‘यमला पगला दिवाना फिर से’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे यात सलमान खान, रेखा, सोनाक्षी सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘मुंबई मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार, रेखा यामध्ये रॅप करताना पाहायला मिळणार आहेत तर सोनाक्षी सिन्हाने चित्रपटात एक गाणं गायलं आहे. सलमान खान आणि शत्रुघ्न सिन्हा यांचे काही गाजलेले संवाददेखील यामध्ये ऐकायला मिळणार आहेत.

Video: ..अन् विद्या बालनचं गाणं ऐकताच कतरिना वैतागली

‘रफ्ता रफ्ता’, ‘ओ मेरे सोना रे’ या काही जुन्या गाण्यांचा चित्रपटाच्या शीर्षकगीतात समावेश करण्यात येणार आहे. यासोबतच त्यात रेखा यांच्या आवाजातील रॅप ऐकायला मिळणार आहे. रेमो डिसूझासोबत बराच सराव केल्यानंतर रेखा यांनी मुंबईतल्या एका स्टुडिओमध्ये नुकताच हा रॅप साँग रेकॉर्ड केला आहे.

वाचा : मुलासमोर धुम्रपान करणाऱ्या अजयला नेटकरी धारेवर धरतात तेव्हा..

२४ तासांत रेकॉर्ड केलेल्या या गाण्याला आता प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. नवनियात सिंग दिग्दर्शित हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rekha raps for yamla pagla deewana phir se starring dharmendra sunny and bobby deol
First published on: 03-04-2018 at 19:07 IST