दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही लोकप्रिय अभिनेत्रींपैक एक आहे. समांथा गेल्या काही दिवसांपासून तिच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. पण यावेळी समांथा तिच्या पहिल्या आयटम सॉंग ‘उ अंतावा उ उ अंतावा’मुळे चर्चेत आहे. तर तिच्या या आयटम सॉंग विरुद्ध तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. हे आयटम सॉंग ‘पुष्मा’ या चित्रपटातलं आहे.

आता तेलुगू मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, पुरुषांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेने या गाण्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. या गाण्यावर बंदी आणण्याची मागणी केली जात आहे. या गाण्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत गाण्याच्या बोलांवर आक्षेप घेण्यात आला आहे. यात पुरुषांची घाणेरडी विचारसरणी दाखवण्यात आली आहे की ते नेहमी फक्त सेक्सबद्दलच विचार करतात.

आणखी वाचा : ‘तारक मेहता…’ सोनूच्या बॉयफ्रेंडला पाहिलत का?

आणखी वाचा : ‘तू Naked का फिरतेस…’, बॉयफ्रेंड आणि नंतर मित्रांचे प्रश्न ऐकून नियाला बसला होता धक्का

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समांथाचं हे पहिलं आयटम सॉंग आहे. ‘पुष्पा’ या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसत आहेत. पुष्मा हा चित्रपट तेलुगू, तामिळ, हिंदी, मल्याळम आणि कन्नड अशा ६ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.