येत्या २८ ऑगस्टपासून प्रेक्षकांना टेलिव्हिजनवर पुन्हा एकदा बिग बींच्या भारदस्त आवाजातील ‘कंम्प्युटरजी लॉक किया जाए’ हे वाक्य ऐकायला मिळणार आहे. कारण टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय शो ‘कौन बनेगा करोडपती’चा नववा सिझन सुरु होतोय. मागील आठ सिझनप्रमाणे या सिझनचंही सूत्रसंचालन बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन करणार आहेत. मात्र त्यापूर्वी एका वेगळ्याच कारणामुळे हा शो चर्चेत आलाय. हा शो चर्चेत येण्याचं कारण बिग बी किंवा ‘केबीसी’चा एखादा स्पर्धक नसून कॉमेडीयन कपिल शर्मा आहे. कपिल शर्मा बिग बींसोबत ‘केबीसी’चा स्पेशल शो शूट करणार असल्याची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा होती.
‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज’च्या FWICE संपामुळे कपिलचं ‘केबीसी’चं शूट रद्द केल्याचं म्हटलं जात होतं. मात्र या सर्व चर्चा आता खोट्या ठरल्या आहेत. सोनी वाहिनीचे बिझनेस हेड दानिश खान यांनी तसं स्पष्ट केलंय. किंबहुना कपिल शर्मासोबत ‘केबीसी’चा कोणताच एपिसोड शूट होणार नव्हता असं त्यांनी सांगितलंय. ट्विटर अकाऊंटवर पोस्ट टाकत दानिश खान यांनी यासंबंधीची माहिती दिली. ‘हे खोटं आहे. केबीसीचं शूटिंग सुरु आहे आणि कपिल शर्मासोबत अमिताभ बच्चन एक एपिसोड शूट करतील असं कधी ठरलंच नव्हतं,’ असं त्यांनी ट्विटरवर म्हटलंय.
Not true. KBC shoot is on and there was never any plan of Mr. Bachchan shooting with Mr. kapil sharma. https://t.co/7taKMh7CoY
— Danish Khan (@001Danish) August 18, 2017
T 2510 – Just back from work ! and a day filled with reliving 17 years of KBC and my term with it .. 17 years !! goodness that is a lifetime pic.twitter.com/E5qlqSqVYB
— Amitabh Bachchan (@SrBachchan) August 8, 2017
PHOTOS : विराट-अनुष्काने असा साजरा केला आनंद
या चर्चा जरी खोट्या ठरल्या तरी प्रेक्षकांना ‘केबीसी’मध्ये हॉटसीटवर कपिल शर्माला बघणं नक्कीच आवडेल. २८ ऑगस्टपासून रात्री नऊ वाजता ‘कौन बनेगा करोडपती’ शो प्रसारित होणार आहे. दरम्यान बिग बी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन ‘केबीसी’च्या शूटिंगचे अपडेट्स देत असल्याचं पाहायला मिळतंय.
T 2443 – Ok … so the pictures of KBC shoot got clearance , so there .. pic.twitter.com/lAsrDDy4ek
— Amitabh Bachchan (@SrBachchan) June 2, 2017