बॉलिवूडची ग्लॅम दीवा करिना कपूर खान मुलगा तैमुरच्या जन्मानंतर चित्रपटसृष्टीत पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. तिने ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटासाठी चित्रीकरण सुरु केले असून, त्याचसाठी ती तैमुरसह दिल्लीला गेली होती. सध्याच्या प्रसिद्ध स्टार किडपैकी एक असलेल्या तैमुर अली खानवर सर्वच माध्यमांच्या नजरा खिळल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाचा : जाणून घ्या, ‘तुझं माझं ब्रेक अप’ या नवीन मालिकेची कथा

‘वीरे दी वेडिंग’मध्ये तैमुरही दिसणार असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. मात्र, करिनाने तिच्या हटके अंदाजात सर्व चर्चांना फेटाळून लावले. चित्रपटाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर यासंबंधीत एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ‘तैमुर नाही पण त्याची आई चित्रपटात काम करते आणि हे पुरेस आहे. तुम्ही दोघांनाही चित्रपटात घेऊ शकत नाही. कारण रियाला ते परवडणार नाही. त्यामुळे ती दोघांपैकी एकालाच चित्रपटात घेऊ शकते,’ असे करिना (हसत) म्हणाली. व्हिडिओ सुरु असताना करिनाला चित्रपटातील तिचा लूक दाखवण्याचीही इच्छा होती. मात्र, त्यासाठी निर्मांत्यांची परवानगी नसल्यामुळे ‘तुम्हाला केवळ आता माझा चेहराच बघता येईल,’ असेही ती म्हणाली. दरम्यान, तैमुर मला परवडणार नाही असे स्वतः रियादेखील व्हिडिओत म्हणताना दिसते.

वाचा : कंगनासाठी तो सर्वात कठीण काळ होता- विशाल भारद्वाज

तैमुरचा जन्म झाल्यापासूनच त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गोंडस आणि गुबगुबित अशा या चिमुकल्यावर प्रत्येकाची नजर खिळून राहते. व्हायरल होणाऱ्या फोटोंबद्दल करिनाला विचारले असता ती म्हणाली, सध्या प्रत्येकाचेच फोटो खूप सहज उपलब्ध होतात. तुमच्याबद्दल अधिकाधिक माहिती लोकांना मिळावी या उद्देशाने तुम्ही फेसबुक, इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करता. विविध कार्यक्रमांमधील फोटो शेअर केले जातात आणि त्यात इतर व्यक्तींनाही टॅग केले जाते. सेलिब्रिटींच्या आयुष्यात ही खूप सामान्य बाब आहे. त्यामुळे आम्ही तैमुरचे फोटो काढण्यापासूनही कोणालाच थांबवत नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rhea kapoor cant afford both of us kareena kapoor khan on taimur ali khan being a part of veere de wedding
First published on: 15-09-2017 at 15:25 IST