शीर्षक वाचून तुम्हाला कदाचित धक्का बसला असेल. हे खरंय का? असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल. पण याबाबत आधी कसे कळले नाही. सेलिब्रिटींच्या अफेअर्सबद्दल तर अनेकदा चवीने बोललं जातं. मग रणबीर आणि तापसीच्या नात्याबद्दल कसे बोलले गेले नाही? असे एक ना अनेक प्रश्न तुमच्या मनात आले असतील. तापसी पन्नू ही ऋषी कपूर यांची सून होणार हे जरी खरे असले तरी ती खऱ्या आयुष्यात नाही तर सिनेमात सून होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याबाबतीत बाबांपेक्षाही वरचढ आहे आर्यन खान

यात प्रतिक बब्बर ऋषी यांच्या मुलाची भूमिका साकारताना दिसेल आणि तापसी त्याच्या वहिणीच्या भूमिकेत. हा चित्रपट नक्षलवाद आणि दहशतवाद या नाजूक मुद्याला स्पर्श करणारा आहे. आपल्या कुटुंबाच्या हक्कासाठी लढणाऱ्या सुनेच्या भूमिकेत तापसी दिसणार आहे.
सध्या तापसी ‘जुडवा २’च्या चित्रीकरणात व्यग्र आहे. डेव्हिड धवन दिग्दर्शित हा सिनेमा सलमान खानच्या ‘जुडवा’ या गाजलेल्या सिनेमाचा सीक्वल आहे.

तापसीसोबत यात जॅकलिन फर्नांडिस आणि वरूण धवन मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाचे लंडनमधील चित्रीकरण संपले असून सध्या मुंबईत सिनेमाचा काही भाग चित्रीत होत आहे. गेल्या वर्षी पासून तापसीला सिनेमांची लय मिळाली आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. ‘पिंक’ आणि ‘नाम शबाना’ हे दोन ताकदीचे सिनेमे तिच्या नावावर आहेत.

अभिनेत्री नाही तर कॉमेडियन बनून नाव कमवतेय जॉनी लिवरची मुलगी

या दोन्ही सिनेमातील तापसीच्या अभिनयाचे बरेच कौतुक झाले. आता ऋषी यांच्या सूनेची भूमिका तापसी कशी साकारते, हीच उत्सुकता तिच्या चाहत्यांना आहे. अभिनय देव दिग्दर्शित या सिनेमाचे नाव अद्याप ठरलेले नाही. ऋषी कपूरही लवकरच अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘१०२ नॉट आऊट’ या सिनेमात दिसणार आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने तब्बल २६ वर्षांनंतर अमिताभ व ऋषी कपूर यांची जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. यात अमिताभ हे चक्क ऋषी यांच्या वडिलांची भूमिका साकारताना दिसतील.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rishi kapoor to play taapsee pannus father in law in abhinay deos next
First published on: 30-06-2017 at 16:37 IST