बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. रितेश सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत रितेश चाहत्यांच्या संपर्कात राहतो. बऱ्याचवेळा त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. नुकताच रितेशने एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा : “बाप कुणाला कळतो गं…”, मंजिरी ओकने Father’s Day निमित्ताने पती प्रसादसाठी शेअर केली ‘ही’ खास पोस्ट

रितेशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत रितेश गाडीत असल्याचे दिसत आहे. यावेळी हाताच्या अंगठ्याने प्रत्येक बोटाला स्पर्श करून दाखवत आहे. त्याचवेळी तो त्याच्या तर्जणीला करंगळीशी स्पर्श करून दाखवताना दिसतो. रितेशच्या व्हिडीओनुसार जगातील लोकसंख्येच्या फक्त १ टक्के लोकांनाच असे जमते. मात्र, रितेशने हे सहजपणे करून दाखवले आहे.

आणखी वाचा : ब्रह्मास्त्र: रणबीर कपूरने मंदिरात बूट का घातले? दिग्दर्शक अयान मुखर्जीने दिले स्पष्टीकरण

आणखी वाचा : Don 3 साठी बिग बी आणि किंग खान येणार एकत्र? अमिताभ यांच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ‘वेड’ या मराठी चित्रपटात अभिनेता रितेश देशमुख हा वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. २० वर्ष अभिनय कारकीर्द गाजवल्यानंतर आता रितेश या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटाद्वारे अभिनेत्री जिनिलिया देशमुख ही तब्बल १० वर्षांनी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. यासाठी तिने ‘वेड’ या मराठी चित्रपटाची निवड केली आहे. या पूर्वी जिनिलियाने हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम अशा तब्बल ५ भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.