महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आज २६ मे रोजी जयंती आहे. त्यांच्या ७६व्या जयंती निमित्ताने मुलगा अभिनेता रितेश देशमुख आणि सून, अभिनेत्री जेनेलिया डिसुजाने एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रितेशने वडिलांसोबतचा लहानपणीचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने ‘देवा कृपा कर आणि घड्याळाचे काटे पुन्हा उलटे फिरव.. मला तुमची रोज आठवण येते बाबा… वाढदिवसाच्या शुभेच्छा’ या आशयचे कॅप्शन दिले आहे.

तर जेनेलियाने सासरे विलासराव देशमुख यांना मिठी मारतानाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो रितेश आणि जेनेलियाच्या लग्नातील आहे. हा फोटो शेअर करत तिने ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा.. आम्हाला रोज तुमची आठवण येते.. बापलेकीची ही मिठी चिरंतन राहील’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

गेल्या वर्षी रितेशने वडिलांच्या ७५व्या जयंतीनिमित्त एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये विलासरावांच्या पोषाखाला बिलगून रितेश त्यांचे अस्तित्व जाणवून घेताना दिसत होता. रितेश देशमुख त्यावेळी भावनिक झाला असून डोळ्यावर अश्रू तरळताना दिसून येत होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Riteish deshmukh genelia dsouza remember late vilasrao deshmukh on his birth anniversary avb
First published on: 26-05-2021 at 13:27 IST