“मला जाऊ द्या…आई माझी वाट पाहतेय”, रितेश देशमुखचा जिममधील धमाल व्हिडीओ व्हायरल

रितेश देशमुखने जिममधील एक व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय.

ritesh-deshmukh-viral-video
(Photo-Instagram@riteishd)

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. सोशल मीडियावर धमाल व्हिडीओ शेअर करत रितेश चाहत्यांचं मनोरंजन करत असतो. नुकताच रितेशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक मजेशीर व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून नेटकऱ्यांची व्हिडीओला मोठी पसंती मिळतेय.

रितेश देशमुखने जिममधील एक व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. या व्हिडीओत रितेश त्याच्या जिम ट्रेनरसमोर हात जोडून घरी जाण्यासाठी विनवणी करताना दिसतोय. तर जिम ट्रेनर मात्र रितेशला जबरदस्ती वर्कआउट करण्यास सांगत असल्याचं पाहायला मिळतय. या व्हिडओत रितेश “मला जाऊ द्या माझी आई घरी माझी वाट पाहत आहे.” असं म्हणताना दिसतोय.

हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये रितेश म्हणाला, “पेंडुलम – लेग मशीन जिचा मला तिरस्कार आहे.” लेग डे असल्याने रितेश जिममधून पळ काढण्याच्या प्रयत्नात असल्याचं या व्हिडीओत दिसतंय.


रितेश अनेकदा पत्नी जिनेलियासोबत मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतो. रितेश आणि जिनेलियाच्या जोडीला चाहत्यांची कायम पसंती मिळताना दिसते. रितेश लवकरच अक्षय कुमारसोबत ‘बच्चन पांडे’ सिनेमात झळकणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ritesh deshmukh share funny video from jym leg day goes viral kpw