बॉलिवूडमधील सर्वांचे लाडके आणि आवडते कपल म्हणजे अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसूजा. ते दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सतत मित्रमैत्रीणींसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांशी संवाद साधत असतात. आता रितेशने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो ‘एक्स’ विषयी बोलताना दिसत आहे.

रितेशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो, ‘मला कळत नाही लोक एक्स विषयी इतके दु:खी का असतात.. कारण एक्स सोडून आणखी २५ अल्फाबेट अजून आहेत या दुनियेत’ असे बोलताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने ‘एक्स फॅक्टर’ असे कॅप्शन दिले आहे. त्याचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आणखी वाचा : रिअ‍ॅलिटी शोमध्ये दाखवतात ते खरं असतं का?; परिणीतीने केला खुलासा, म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी जिनिलियाने एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये तिला तिची मैत्रीण ‘तुला काय वाटते, पुरुष महत्त्वाचे वाटतात का?’ असा प्रश्न विचारताना दिसत होती. या प्रश्नावर जिनिलियाने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. जिनिलिया विचित्र चेहरा करत म्हणते, ‘कशासाठी?’ जिनिलियाचे उत्तर ऐकून रितेशला धक्काच बसला होता. त्यानंतर आता रितेशने ‘एक्स’ विषयी बोलतानाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.