टीव्ही मालिकेतील ‘छोटी बहू’ बनून छोट्या पडद्यावर राज्य करणारी अभिनेत्री रूबीना दिलैक तिच्या सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. रूबीना दिलैक यापूर्वी बिग बॉस शोमध्ये विजेती ठरलीय. बिग बॉसमधून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. तिची अदा आणि स्टाइलला तिचे फॅन्स मोठी पसंती देत असतात. छोट्या पडद्याबरोबरच सोशल मीडियावर सुद्धा ती खूप फेमस आहे. सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोइंग सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे. तिचे डान्स व्हिडीओवर सुद्धा फॅन्स लाखोंच्या संख्येने कमेंट करत असतात. नुकतंच तिने तिचा एक BTS व्हिडीओ शेअर केलाय. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
रूबीना दिलैक हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा BTS व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये रूबीनाची शानदार स्टाइल दिसून येतेय. या व्हिडीओमध्ये तिने फ्लोरल प्रिंटची सुंदर साडी परिधान केलीय. या साडीवर वेगळ्या स्टाइलचा ब्लाउज परिधान केलाय. त्यावर लाइट मेकअप करून तिचं सौंदर्य आणखी खुललंय. तिने हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर काही तासांतच ५१ हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला. तिच्या या नव्या लुकचं फॅन्स भरभरून कौतुक करताना दिसून येत आहेत.
View this post on Instagram
रूबीना दिलैकी हिने २००८ मध्ये ‘छोटी बहू’ या मालिकेतून टीव्ही क्षेत्रात पहिलं पाऊल टाकलं. त्यासोबत तिने बड्या बॅनर्सच्या अनेक मालिकांमध्ये सुद्धा काम केलंय. ‘बिग बॉस’ या शोचं विजेतेपद देखील तिने आपल्या नावावर केलंय. २०१८ मध्ये तिने अभिनव शुक्लासोबत लग्न केलं. सध्या ती ‘शक्ति-अस्तित्व के एहसास की’ या मालिकेत सौम्याची भूमिका साकारत आहे. लवकरच ती हितेन तेजवानी आणि राजपाल यादव यांच्यासोबत बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे.