करोनाच्या तिसऱ्या लाटेनं देशभरात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस करोनाच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेतून बॉलिवूड आणि टीव्ही सेलिब्रेटीही सुटलेले नाही. करोनाच्या या तिसऱ्या लाटेत बिग बॉस १४ ची विजेती आणि टीव्ही अभिनेत्री रुबीना दिलैकला पुन्हा एकदा करोनाची लागण झाली. मागच्या वर्षी मे महिन्यातही रुबीनाला करोनाची लागण झाली होती. त्यावेळी तिची तब्येत बरीच ढासळली होती आणि आता ८ महिन्यात पुन्हा एकदा रुबीनाला करोनाचं संक्रमण झालं. याचा खुलासा तिनेच सोशल मीडियावरून केला आहे.

रुबीनानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तिला दुसऱ्यांदा करोनाची लागण झाली होती याची माहिती दिली. आता रुबीनाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून ती ठीक असल्याचंही तिनं तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे. इन्स्टाग्रामवर काही स्टनिंग फोटो शेअर करत काही दिवसांपूर्वीच आपल्या पुन्हा एकदा करोनाचं संक्रमण झालं होतं असं रुबीनानं सांगितलं आहे.

इन्स्टाग्रामवर ग्लॅमरस आणि स्टनिंग फोटो शेअर करताना रुबीनानं लिहिलं, ‘करोनाच्या तिसऱ्या लाटेनं माझ्या आरोग्यावर दुसऱ्यांदा आघात केला असला तरीही करोना अद्याप माझी हिंमत तोडू शकलेला नाही. त्यामुळेच मी आता माझं छोटं छोटं यश देखील सेलिब्रेट करते. यामुळे माझं आयुष्य आणखी सुंदर होतं. आता मी पूर्णपणे ठीक झाले आहे.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोंमध्ये रुबीना दिलैक जांभळ्या रंगाचा ड्रेस आणि ग्लिटरी मेकअपमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. रुबीनाच्या कामाबद्दल बोलायचं तर ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘अर्ध’ या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये पाऊल टाकणार आहे. या चित्रपटात राजपाल यादव आणि हितेन तेजवानी यांच्याही मुख्य भूमिका आहेत.