प्रभास व श्रद्धा कपूर यांची मुख्य भूमिका असलेला ‘साहो’ हा चित्रपट शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला. बिग बजेट असलेला हा चित्रपट प्रदर्शनापूर्वी प्रचंड चर्चेत आला होता. मात्र प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने प्रेक्षकांची निराशा केली. परंतु असं असतानाही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे. या चित्रपटाने केवळ तीन दिवसांमध्ये ८० कोटींचा गल्ला जमवला आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.
३५० कोटी रुपये बजेट असलेला हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तमिळ अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित झाला. पहिल्या दिवशी एकूण ६८ कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटाने आतापर्यंत ७९.०८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने २४.४० कोटी रुपयांची कमाई केली होती. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी अनुक्रमे २५.२० आणि २९.४८ कोटी रुपये कमावले आहेत. या तीन दिवसांमध्ये शनिवार-रविवार आल्यामुळे या चित्रपटाला विकेंडचा फायदा झाल्याचं पाहायला मिळालं.
#Saaho sets the BO on… Shows big gains on Day 3… Packs a phenomenal total in its opening weekend… North and East India are exceptional, other circuits fantastic too… Fri 24.40 cr, Sat 25.20 cr, Sun 29.48 cr. Total: ₹ 79.08 cr Nett BOC. India biz. #Hindi version.
— taran adarsh (@taran_adarsh) September 2, 2019
वाचा : Photo : ‘दो दिल मिल रहें हैं मगर… ‘! अर्जुनने शेअर केला ‘हा’ फोटो
दरम्यान, प्रभास आणि श्रद्धासोबत या चित्रपटामध्ये नील नितीन मुकेश, मंदिरा बेदी, जॅकी श्रॉफ यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक सुजीतने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.