येत्या स्वातंत्र्यदिनी दोन महत्त्वपूर्ण चित्रपट आणि बहुचर्चित वेब सीरिजशी टक्कर टाळण्यासाठी अभिनेता प्रभासच्या ‘साहो’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता ‘साहो’ 15 ऑगस्टऐवजी ३० ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 15 ऑगस्ट रोजी अक्षय कुमारचा ‘मिशन मंगल’, जॉन अब्राहमचा ‘बाटला हाऊस’ आणि नेटफ्लिक्सवर ‘सेक्रेड गेम्स २’ ही वेब सीरिज प्रदर्शित होणार आहे.
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने ‘साहो’च्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल झाल्याची माहिती दिली. प्रभासच्या ‘बाहुबली २’ या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर सर्वांनाच या चित्रपटाची उत्सुकता आहे. पण आता प्रेक्षकांना आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
IT’S OFFICIAL… #Saaho shifted to 30 Aug 2019.
— taran adarsh (@taran_adarsh) July 19, 2019
अॅक्शन थ्रिलर असलेला ‘साहो’ हिंदी, तामिळ आणि तेलुगू अशा तीन भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये प्रभास, श्रद्धासोबतच नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, चंकी पांडे, महेश मांजरेकर आणि मंदिरा बेदी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.