बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्न चित्रपटांची निर्मिती आणि पॉर्न अ‍ॅपप्रकरणी १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली. अशातच आता अनेक गोष्टी समोर येत आहेत. अभिनेत्री सागरिका सोना सुमनने खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. राज कुंद्राने न्युड ऑडिशन द्यायला सांगितलं होतं, असा आरोप सागरिकाने केला होता. आता सागरिकाला कॉल आणि मेसेज करून धमकी मिळत असल्याचे तिने सांगितले आहे.

एका वृत्त वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार सागरिकाने हा खुलासा केला आहे. “मला खूप चिंता वाटते कारण मला सगळ्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून फोन आणि मेसेज करत धमकी मिळतं आहे. ते मला धमकावत आहेत. मला जीवे मारण्याची आणि बलात्काराची धमकी देत आहेत. लोक मला वेगवेगळ्या नंबरवरून कॉल करत आहेत आणि राज कुंद्राने काय चूक केली आहे? असा प्रश्न विचारत आहेत,” असे सागरीका म्हणाली.

आणखी वाचा : नवीन App सुरु करण्याचा होता राज कुंद्रांचा विचार; मेहुणी शमिता शेट्टीही करणार होती काम

पुढे ती म्हणाली, “ते मला धमकावत आहेत आणि माझ्यावर त्यांचा व्यवसाय बंद करण्याचा आरोप करत आहेत. या लोकांमुळे मला माझ्या जीवाचा धोका वाटत आहे. मी या लोकांविरूद्ध पोलिसात तक्रार दाखल करणार आहे.”

आणखी वाचा : “ए आर रहमान कोण आहे?, ‘भारतरत्न’ माझ्या वडिलांच्या पायाच्या नखाच्या बरोबरीचा”

राज कुंद्रावर आरोप करत काय म्हणाली होती सागरीका…

“मी सागरिका सोना सुमन. हे अश्लील चित्रपटांचं एक मोठं रॅकेट आहे. यामध्ये मोठे लोक सहभागी आहेत. राज कुंद्रा याचं नाव समोर आलं आहे. लॉकडाउनच्या काळात मलाही एक वाईट अनुभव आला होता. ऑगस्ट २०२० मध्ये मला एका वेब सीरिजमध्ये काम करण्याची ऑफर आली होती. मी होकार दिल्यानंतर राज कुंद्राच्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर उमेश कामत यांचा मला फोन आला. माझी ऑनलाइन ऑडिशन घेण्याचं ठरलं. मी व्हिडीओ कॉलमध्ये सहभागी झाल्यानंतर माझ्याकडे नग्न ऑडिशन देण्याची मागणी केली गेली. मला धक्काच बसला आणि मी नकार देत कॉल बंद केला”, असा अनुभव अभिनेत्री सागरिका सोना सुमनने केला आहे.

आणखी वाचा : मीरा कपूरने शेअर केलं बेडरूम सिक्रेट; सेक्स पोजीशनबद्दल केलं भाष्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“त्या व्हिडीओ कॉलमध्ये तीन लोक होते. ज्यात एकाचा चेहरा दिसत नव्हता, पण ती व्यक्ती राज कुंद्रा होती. कारण कुंद्राचा सहाय्यक असलेला कामत सतत या सर्व वेबसाईट राज कुंद्रा चालवतात, असं म्हणत होता. राज कुंद्राने मला न्यूज ऑडिशन द्यायला सांगितलं होतं. राज कुंद्राचं नावही आज समोर आलं आहे. लवकरात लवकर या लोकांना अटक करण्यात यावी, कारण खूप लोकांचं आयुष्य या रॅकेटमुळे खराब होत आहे”, असं सागरिकाने म्हटलं आहे.