अभिनेत्री सई ताम्हणकर, ललित प्रभाकर आणि पर्ण पेठेचा ग्लॅमरस अंदाजातील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा ग्लॅमरस फोटो कोणत्या तरी फोटोशूट मधील असेल असा निष्कर्ष लावण्यात येत आहे. पण त्यांचा हा फोटो कोणत्या फोटोशूटमधील नसून त्यांच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर आहे. या चित्रपटाचे नाव ‘मीडियम स्पाइसी’ असे आहे.

‘मीडियम स्पाइसी’ हा नागरी जीवनातल्या प्रेम, नातेसंबंध आणि लग्नसंबंधांवर प्रकाश टाकणारा सिनेमा आहे. या चित्रपटात सई ताम्हणकर, पर्ण पेठे, ललित प्रभाकर य़ांच्याशिवाय सागर देशमुख, नेहा जोशी, पुष्कराज चिरपुटकर, इप्शिता, या युवाकलाकारांसोबतच नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी हे ज्येष्ठ कलाकारही महत्वपूर्ण भूमिकांमधून दिसणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोहित टाकळकर दिग्दर्शित आणि इरावती कर्णिक लिखीत ‘मीडियम स्पाइसी’ हा चित्रपट 5 जून 2020ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात सई ताम्हणकर, ललित प्रभाकर आणि पर्ण पेठे हे त्रिकुट पाहण्यासाठी चाहते उत्सुक असल्याचे पाहायला मिळते.