दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपतीसोबत झळकणार सई ताम्हणकर, चाहत्यांकडून कौतुकांचा वर्षाव

सईनेच्या सोशल मीडिया पोस्टवरून चर्चा…

sai tamhankar, vijay sethupati, navarasa,
सईनेच्या सोशल मीडिया पोस्टवरून चर्चा…

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर काही दिवसांपूर्वी ‘मीमी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आता सई नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘नवरसा’ या तमिळ सीरिजमध्ये ती महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. आता सईने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

सईने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत सई तामिळ अभिनेता विजय सेतुपथीसोबत दिसत आहे. विजय सेतुपतीला या आधी आपण ‘मास्टर’ या चित्रपटात पाहिले होते. सईने हा फोटो शेअर करत तामिळमध्ये कॅप्शन दिल्याने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Tamhankar (@saietamhankar)

आणखी वाचा : ‘राज कुंद्रा मला किस करत म्हणाला, माझे शिल्पासोबतचे संबंध ठीक नाहीत आणि…’, शर्लिन चोप्राचा धक्कादायक दावा

दरम्यान, ‘नवरसा’ या सीरिजचे दिग्दर्शन आणि निर्मिती जेष्ठ चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांनी केले आहे. या वेब सीरीजमध्ये दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि अभिनेत्री असणार आहेत.

आणखी वाचा : याला म्हणतात खरं प्रेम! विक्रम बत्रा यांची प्रेयसी आजही आहे अविवाहीत

सीरिजची पटकथा कशी असणार आहे?

‘नव’ म्हणजे ९ आणि ‘रसा’ म्हणजे मानवी भावना अर्थात राग, करुणा, धैर्य, द्वेष, भीती, हशा, प्रेम, शांती आणि आश्चर्य. मणिरत्नम यांच्या या नवा प्रकल्पात ‘नवरसा’मध्ये मानवाच्या या ९ भावनांवर प्रकाश टाकला जाणार आहे. ९ जुलै रोजी नेटफ्लिक्सने या प्रोजेक्टचा टीझर प्रदर्शित केला होता. या व्हिडीओमध्ये सूर्या, सिद्धार्थ, प्रकाश राज, विजय सेतुपति, रेवती, ऐश्वर्या राजेश आणि बरेच कलाकार दिसले. विशेष म्हणजे या प्रोजेक्टमधून होणारी कमाई मनोरंजन विश्वातील गरजू तंत्रज्ञ मंडळीना दिली जाणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sai tamhankar with the south actor vijay sethupati in navarasa series dcp