अभिनेत्री करीना कपूर तिच्या खास स्टाइलसाठी कायमत ओळखली जाते. दोन मुलांना जन्म दिल्यानंतरही करीनाच्या फॅशनमध्ये बदल झालेला नाही. करीना तिच्या खास ड्रेसिंग स्टाइलमुळे कायम चर्चेत असते. गरोदरपणातही करीनाने तिच्या खास ड्रेसिंगने अनेकांचं लश्र वेधून घेतलं होतं. मात्र तुम्हाला माहित आहे का एका सिनेमाच्या प्रमोशनवेळी करीनाचा ड्रेस पाहून सैफ अली खान तिच्यावर चांगलाच भडकला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेत्री करीना कपूर ‘विरे दी वेडिंग’ सिनेमाच्या एका प्रमोशनसाठी तयार झाली होती. यावेळी करीनाचा ड्रेस पाहून सैफ चांगलाच भडकला. एवढचं नाही तर त्याने करीनाला कपडे बदलून दुसरा ड्रेस घालण्यास सांगितलं होतं. करीना कपूरने स्वत: एका मुलाखतीत या गोष्टीचा खुलासा केला होता.

२०१८ सालात करीना ‘वीरे दी वेडिंग’ मध्ये झळकली होती. तैमूरच्या जन्मानंतर करीनाने या सिनेमातून कमबॅक केलं होतं. या सिनेमाच्या एका म्युझिक इव्हेंटला करीना एका ब्लॅक ड्रेसमध्ये पोहलली होती. ब्लॅक करलचा स्कर्ट आणि टॉप तसचं त्यावर ओव्हर कोट असा करीनाचा ग्लमरस लूक इव्हेंटमध्ये सर्वाचं लक्ष वेधून घेत होता. यावेळी अनेकांनी करीनाचं कौतुक केलं. मात्र जेव्हा करीना घरी पोहचली तेव्हा सैफ मात्र तिचा ड्रेस पाहून नाराज झाला होता.

हे देखील वाचा: सलमान खानवर जोरात ओरडल्यानंतर स्वत:च घाबरला होता अभिनेता आदित्य रॉय कपूर

हे देखील वाचा: बॉलिवूड नव्हे तर साउथ स्टारला सुरेश रैनाची पसंती; बायोपिकसाठी ‘या’ अभिनेत्यांची केली निवड

एका रेडिओ स्टेशनवर दिलेल्या मुलाखतीत करीनाने इव्हेंटनंतर घडलेला किस्सा शेअर केला होता. ती म्हणाली, “ब्लॅक ड्रेसमध्ये मी घरी पोहचले तेव्हा सैफ अली खानचा चेहरा पाहण्यासारखा होता. तो म्हणाला, हे काय घातलंय. जा आणि आताच्या आता हे कपडे बदल आणि काही तरी साधे कपडे घालून ये.” करीनाच्या ड्रेसवर सैफने अशी प्रतिक्रिया दिल्यांचं ती म्हणाली.

यावर करीनाने सैफला उलट सवाल विचारला होता. ती म्हणाली, “या ड्रेसमध्ये काय आहे. तू छान दिसतेयस असं सगळे म्हणत होते.” असं म्हणत करीनाने इव्हेंटचे काही फोटो सैफ अली खानला दाखवले. हे फोटो पाहून मात्र करीना सुंदर दिसत असल्याचं सैफ म्हणाला होता. करीना कपूरने स्वत: हा संपूर्ण किस्सा शेअर केला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saif ali khan angry on kareena kapoor in black hot dress said change clothes kpw
First published on: 26-06-2021 at 14:17 IST