NCP Jitendra Awhad On Saif Ali Khan Attack : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. वांद्रे (पश्चिम) येथील त्याच्या घरात घुसून एका चोराने त्याच्यावर चाकू हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यात अभिनेता सैफ जखमी झाला आहे. गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान हा प्रकार समोर आल्यानंतर मनोरंजन क्षेत्राबरोबरच आता राजकीय वर्तुळातून देखील या घटनेबद्दल प्रतिक्रिया समोर येत आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सैफवर झालेला हा हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो अशी शंका व्यक्त केली आहे. आव्हाडांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यासंबंधी पोस्ट केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्यामागे कट्टरतावादी आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे सैफवर चोराने हल्ला केला असल्याचे सांगितले जात असताना या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.

आव्हाड नेमकं काय म्हणालेत?

आव्हाड त्यांच्या एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हणाले की, “सैफ अली खान यांच्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो.गेली अनेक वर्ष ज्या पद्धतीने सैफ अली खान यांना त्याच्या मुलाचे नाव तैमूर ठेवल्यावरुन टार्गेट केले जात होते. ते पाहता धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे किंवा कसे? या दिशेने ही तपास होणे आवश्यक आहे. कारण सैफ अली खान यांच्यावर एकूण सहा वार करण्यात आल्याचे प्राथमिक माहितीमधून समोर येत आहे. त्यातील दोन वार हे गंभीर स्वरुपाचे असल्याचे समजते. एक वार त्यांच्या मानेवर करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यांच्या मनक्यावर गंभीर दुखापत झाली आहे”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“हल्लेखोराची वार करण्याची पद्धत बघता, वार हा जिवे मारण्याच्या हेतूनेच करण्यात आल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. सैफ अली खान हे भारतामधील चौथ्या क्रमांकाचा सन्मान समजल्या जाणार्‍या पद्श्री पुरस्काराने सन्मानित आहे. हे विशेष!”, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.