बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि त्याची पत्नी करीना कपूर यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. पण करीनाशी लग्न करण्यााआधी सैफने बॉलिवूड अभिनेत्री अमृता सिंगसोबत केले होते. सैफ आणि अमृताने १९९९ मध्ये लग्न केले होते. त्यावेळी अमृता ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होती. तर सैफने बॉलिवूडमध्ये नुकतेच पदार्पण केले होते. पण काही कारणांमुळे त्यांच्याच मतभेद होऊ लागले आणि २००४ मध्ये त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

सैफ आणि करीनाची पहिली भेट ही २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘टशन’ या चित्रपटा दरम्यान झाली होती. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही. मात्र, करीना आणि सैफची जोडी बनली. सैफ आणि करीना बरेच वर्षे लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. या दोघांनी कोर्टमध्ये जाऊन शासकिय पद्धतीने लग्न केले. त्यानंतर त्यांनी लग्नाविषयी सगळ्यांना सांगितले.

बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये सैफने मुलगी सारा अली खानसोबत हजेरी लावली होती. त्यावेळी सैफने सांगितले की ‘त्याने लग्नाच्या दिवशी पूर्वाश्रमीची पत्नी अमृताला एक पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी एकमेकांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.’ यानंतर सैफने मी करीनासोबत लग्न करतोय आणि नवीन आयुष्याची सुरुवात करणार आहे असे त्या पत्रात सांगितले होते.

आणखी वाचा : सुपरस्टार होण्यापूर्वी राजेश खन्ना यांच्या घरी AC ठिक करायला गेला होता ‘हा’ अभिनेता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सैफचं हे पत्र वाचल्यानंतर अमृतावर सकारात्मक परिणाम झाला आणि तिने स्वतःच्या हाताने त्यांची मुलगी सारा अली खानला तयार करून सैफच्या लग्नात पाठवले. सैफच्या लग्नात साराने त्याचं अभिनंदन केलं आणि त्याच्या नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या असंही म्हटलं जातं.