प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा सैराट हा चित्रपट प्रदर्शित होऊन ६ वर्षे उलटली आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला होता. या चित्रपटातील काही सीन तर प्रेक्षकांमध्ये एवढे लोकप्रिय झाले होते की त्याची जोरदार चर्चा झाली होती. या चित्रपटात अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता आकाश ठोसर यांच्या मुख्य भूमिका होत्या. आता चित्रपटाला ६ वर्षे पूर्ण झालीत या निमित्ताने रिंकू राजगुरुने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

रिंकूने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. आज या ब्लॉकबस्टर चित्रपटाला तब्बल ६ वर्षे पूर्ण झाली आहेत. तरीसुद्धा हा चित्रपट नुकतंच प्रदर्शित झाल्यासारखा वाटतो कारण या कलाकारांची क्रेझ आजही लोकांमध्ये पाहायला मिळते. रिंकूने शेअर केलेल्या फोटोमध्ये रिंकू, आकाश ठोसर, तानाजी गालगुंड, अरबाज शेख दिसत आहेत. या सगळ्या कलाकारांना या चित्रपटाने एका रात्रीत सुपरस्टार बनवलं होतं. हा फोटो शेअर करत सैराटला ६ वर्ष पूर्ण झालीत अस कॅप्शन रिंकूने दिलं आहे.

आणखी वाचा : ‘चंद्रमुखी’ प्रदर्शित होताच प्राजक्ता माळीने शेअर केली ही खास पोस्ट, म्हणाली…

आणखी वाचा : “भारतात मुस्लिमांवर मोठ्या प्रमाणात होणारा हिंसाचार…”, अभिनेत्री पद्मा लक्ष्मीचे ट्वीट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रिंकूने शेअर केलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोघांनीही त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ चित्रपटातून केली होती. त्यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालला होता. या चित्रपटानं त्यावेळी ११० कोटींचा गल्ला जमवला होता. आर्ची आणि परश्याची ही जोडी प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाली होती. यासोबतच त्यांच्या सहज आणि अप्रतिम अभिनयाचंही बरंच कौतुक झालं होतं.