मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्राजक्ता ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ता अमृता खानविलकरसोबतच्या तिच्या लावणीमुळे चर्चेत आहे. या निमित्ताने प्राजक्ताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये प्राजक्ता गुलाबी रंगाच्या साडीत दिसत आहे. हा फोटो शेअर करत “चंद्रमुखी प्रिमियर, अम्मो अमृता खानविलकर तुझ्या आयुष्यातला हा पहिला मुख्य भूमिका असलेला चित्रपट आणि तू त्यात अप्रतिम काम केलं आहेस. तुझा हा कधीच न पाहिलेला अवतार. यासोबतच तू आता एक बेन्चमार्क सेट केलं आहेस की चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आपण किती मेहनत केली पाहिजे हे तुझ्या धावपळीला साष्टांग दंडवत प्रणाम, चंद्रमुखीवर प्रेक्षकांच्या प्रेमाचा धो धो वर्षाव होवो ह्याच शुभेच्छा. चंद्रमुखी आजपासून थिएटरमध्ये”, असे कॅप्शन प्राजक्ताने दिले आहे.

आणखी वाचा : “भारतात मुस्लिमांवर मोठ्या प्रमाणात होणारा हिंसाचार…”, अभिनेत्री पद्मा लक्ष्मीचे ट्वीट चर्चेत

आणखी वाचा : “अमृताला खडूस नेत्रकटाक्ष…”, प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्राजक्ता आणि अमृताने चंद्रमुखी चित्रपटातील सवाल जवाब लावणी करताना दिसत आहेत. प्रसाद ओक दिग्दर्शित, चिन्मय मांडलेकर लिखित या चित्रपटात अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे, मृण्मयी देशपांडे, मोहन आगाशे, राजेंद्र शिसतकर, समीर चौघुले, अशोक शिंदे, नेहा दंडाळे, राधा सागर यांच्यासह अनेक कलाकार आहेत. तर चित्रपटाचे छायाचित्रण संजय मेमाणे यांनी केले आहे. अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित, क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन प्रस्तुत फ्लाईंग ड्रॅगन एंटरटेनमेंट, येलस्टार फिल्म्स, लाईटविदिन एंटरटेनमेंट सहप्रस्तुत ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट येत्या २९ एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.