‘सैराट’ या आगामी मराठी चित्रपटातील ‘झिंग झिंग झिंगाट’ हे गाणे सध्या महाराष्ट्रात गाजत आहे. अजय-अतुलच्या गाण्यांनी आजवर आबालवृद्धांना ठेका धरायला लावणाऱया गाण्यांचा नजराणा पेश केला. त्या नजराण्यात ‘सैराट’मधील ‘झिंगाट’ या गाण्याची भर पडली आहे. अजय-अतुलने आपल्या गाण्यांनी आजवर संपूर्ण महाराष्ट्राला ठेका धरायला भाग पाडले. पण यंदा पहिल्यांदाच हे दोघंही आपल्याच गाण्यावर बेधुंद होऊन नाचताना दिसून आले.
‘सैराट’ चित्रपटातील गाण्याच्या प्रदर्शन कार्यक्रमावेळी चित्रपटाच्या संपूर्ण टीमने ‘झिंगाट’ गाण्यावर तुफान डान्स केला. दिग्दर्शक नागराज मंजुळेने ‘दस्तूरखुद्द सैराटांचं झिंगाट..’, या मथळ्यासह आपल्या फेसबुक अकाऊंटवर कार्यक्रमातील व्हिडिओ शेअर केला आहे, तर युट्यूबवर देखील हा व्हिडिओ चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. ‘सैराट’ चित्रपट येत्या २९ एप्रिलला चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

व्हिडिओ-

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.