बॉलिवूड इंडस्ट्रीला ग्लॅमरचे विश्व म्हणतात. प्रत्येकाने इथे आपली एक ओळख निर्माण केली आहे. मग ते कलाकार असो किंवा फॅशन डिझायनर. फॅशन डिझायनर स्वप्निल शिंदे जो आता ‘सायशा’ म्हणून ओळखला जातो. सायशा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत सायशा चाहत्यांच्या संपर्कात राहते. सायशाने यावेळी सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

आणखी वाचा : समांथासोबत घटस्फोट झाल्यानंतर नागा चैतन्य करतोय ‘या’ अभिनेत्रीला डेट, चर्चांना उधाण

सायशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. यावेळा शेअर केलेल्या फोटोत सायशाने निळ्या रंगाची नऊवारी साडी परिधान केली आहे. हा फोटो शेअर करत सायशा म्हणाली, “आजी हे फक्त तुझ्यासाठी…”

आणखी वाचा : रूट कॅनल करणे अभिनेत्रीला पडले महागात!

आणखी वाचा : ‘ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे’ अशी ओळख असणाऱ्या आनंद दिघेंबद्दलच्या या गोष्टी माहित आहे का?

आणखी वाचा : “बाप कुणाला कळतो गं…”, मंजिरी ओकने Father’s Day निमित्ताने पती प्रसादसाठी शेअर केली ‘ही’ खास पोस्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्यतिरिक्त सायशाने आणखी एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत सायशा म्हणाली, “मला लहानपणापासून मी माझ्या आजीला ‘नऊवारी’ साडी नेसलेली पाहिल आहे, ती कशी नेसली असेल याचे कौतूक वाटायचे आणि मी लहानपणी बंद दाराच्या मागे ती नेसण्याचे प्रयत्न केले आहेत… अनेकदा गाण्यावर डान्स करत असे. हे कधी सत्य होईल असा मी स्वप्नातही विचार केला नव्हता! आणि आज महाराष्ट्राची महान परंपरा परिधान केली आहे.”