सलमान खान व अनुष्का शर्मा यांनी २०१६मध्ये अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘सुलतान’ या चित्रपटात एकत्र काम केलं. या चित्रपटातील दोघांचं अभिनय आणि केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली. यामध्ये दोघांनी कुस्तीपटूची भूमिका साकारली होती. २०१६मधला हा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आणि तेव्हापासूनच सलमान-अनुष्कामध्ये चांगली मैत्रीसुद्धा जमली. हीच जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भव्यदिव्य चित्रपटांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी चित्रपटात सलमान-अनुष्का झळकणार असल्याचं कळतंय.

भन्साळींच्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात सलमानने मुख्य भूमिका साकारली होती. त्यांच्यासोबत पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळत असल्याचं ‘भाईजान’ने काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं. या चित्रपटातील नायिकेसाठी सलमानने स्वत:हून अनुष्काचं नाव सुचवल्याचं समजतंय. या दोघांनी अद्याप अधिकृतरित्या या चित्रपटावर आपली मोहोर उमटवली नसून लवकरच त्यासंदर्भातील अधिक माहिती समोर येईल.

वाचा : दहा दिवसांत ‘2.0’ची ५०० कोटींहून अधिक कमाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या अनुष्का ‘झिरो’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. आनंद एल राय दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख खान, कतरिना कैफ आणि अनुष्का हे त्रिकूट पुन्हा एकदा दिसणार आहे. याआधी तिघांनी ‘जब तक है जान’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं.