scorecardresearch

संजय लीला भन्साळी- सलमान खान यांची जोडी तब्बल २१ वर्षांनी दिसणार पडद्यावर

पण आता तब्बल २१ वर्षानंतर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहे.

संजय लीला भन्साळी- सलमान खान यांची जोडी तब्बल २१ वर्षांनी दिसणार पडद्यावर

अभिनेता सलमान खान आज बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता आहे. कोणतीही भूमिका असो सलमान त्याला पूर्णपणे न्याय देतो. गेल्या काही वर्षांपासून सलमान सतत अॅक्शनपटांमध्ये झळकत आहे. विशेष म्हणजे आजही त्याचा हे चित्रपट प्रेक्षक आवडीने पाहतात. सलमानचा ‘हम दिल दे चुके सनम’ हा चित्रपट तुफान गाजला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केलं होतं. या चित्रपटानंतर संजय लीला भन्साळी आणि सलमान खान यांनी एकदाही एकत्र काम केलेले नाही. पण आता तब्बल २१ वर्षानंतर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहे.

‘पिंकविला’ या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, सलमान खान आणि संजय लीला भन्साळी पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहे. संजय लीला भन्साळी हे सलमान खानच्या ‘बियॉन्ड द स्टार’ या माहितीपटांच्या मालिकेचा एक भाग असणार आहेत. या मालिकेची निर्मिती SKF द्वारे Wiz Films आणि Applause द्वारे केली जाणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या माहितीपटांची मालिका ही सलमान खानच्या जीवनावर आधारित असेल. याबाबत काही दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते यांच्याशी संपर्क साधण्यात येत आहे. यातील काहींशी स्वत: सलमान खानने बातचीत केली. संजय लीला भन्साळी हे त्यापैकी एक होते. संजय लीला भन्साळी यांनी लगेचच या माहितीपट मालिकेचा भाग होण्यास होकार दिला आहे. विशेष म्हणजे याचे काही भागही त्यांनी चित्रित करुन ठेवले आहेत. यात सलमानसोबतच्या मैत्रीचे अनेक किस्से आहेत. दरम्यान यासोबतच या माहितीपटात संजय लीला भन्साळींसोबत आणखी ३० सदस्य झळकणार असल्याचे बोललं जात आहे.

सलमान खान आणि संजय लीला भन्साळी यांच्या दोघात प्रेम आणि द्वेष असे दोन्हीही प्रकारचे संबंध आहेत. हे दोघेही ‘इंशाअल्लाह’ या चित्रपटासाठी तब्बल २१ वर्षानंतर एकत्र येणार होते. मात्र काही कारणात्सव हा चित्रपट रद्द करावा लागला. यामुळे सलमान आणि संजय लीला भन्साळी यांच्यातील संबंध बिघडल्याचे सांगितलं जातं.

विशेष म्हणजे १९९९ मध्ये आलेल्या ‘हम दिल दे चुके सनम’ या प्रेमकथेवर आधारित चित्रपटामध्ये तो झळकलं होता. हा चित्रपट त्याकाळी प्रचंड गाजला होता. विशेष म्हणजे आजही त्याचा हा चित्रपट प्रेक्षक आवडीने पाहतात. या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केलं होतं. या चित्रपटानंतर संजय लीला भन्साळी आणि सलमान खान यांनी एकदाही एकत्र काम केल्याचं पाहायला मिळालं नाही. मात्र तब्बल १९ वर्षानंतर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-10-2021 at 16:03 IST

संबंधित बातम्या