बॉलिवूडचा ‘दबंग’ अभिनेता सलमान खानचा बहूचर्चित ‘राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा चित्रपट जेव्हापासून रिलीज झालाय, तेव्हापासून पायरेसी गॅंगपासून चित्रपटाला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरूच आहेत. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करताना चित्रपटाची पायरेसी होऊ शकते याचा अंदाच सलमानला आधीच आला होता. त्यामुळे त्याने चित्रपट रिलीज झाल्यानंतर पायरेसी करणाऱ्यांना खडेबोल सुनावत चेतावणी देखील दिली होती. परंतू बॉलिवूडच्या ‘दबंग’ खानचा चित्रपट आहे म्हटल्यावर त्याचे फॅन्स अगदी कोणत्याही थराला जातात. सलमानच्या ‘राधे’ चित्रपटाला टेलिग्राम आणि व्हॉट्सअॅपवर लीक होण्यापासून वाचवण्याच्या प्रयत्नात असतानाच आता हा चित्रपट यूट्यूबवर सुद्धा लीक झाल्याची बामती समोर येतेय.
यूट्यूबवर सुद्धा आला ‘राधे’
सलमान खानच्या ‘राधे : युअर मोस्ट वान्टेड भाई’ या चित्रपटाला IMDb वर खूपच कमी रेटिंग मिळाले आहेत. सध्या या चित्रपटाला १० पैकी १.७ इतकेच रेटिंग मिळाले आहे. ४३००० मतांवर आधारित हा रेटिंग असून सलमान भलताच निराश झाला आहे. दुसरीकडे अभिनेता आणि समिक्षक केआरके याने ‘राधे’ची नकारात्मक समिक्षा केल्यानं त्याच्यावर सुद्धा मानहानीचा दावा ठोकण्यात आलाय. ‘राधे’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून या ना त्या अडचणीत अडकतानाच दुसरीकडे पायरेसी गॅंगपासूनही वाचवण्याचा मोठा टास्क या चित्रपटाच्या मेकर्स समोर उभा राहिलाय. काही दिवसांपूर्वीच टेलिग्राम आणि व्हॉट्सअॅपवर हा चित्रपट लीक झाला होता. यूट्यूबवर एका चॅनलवर हा चित्रपट अपलोड करण्यात आला होता. यूट्यूबवरच्या या चॅनलवर लोक हा चित्रपट पाहू लागले. ज्यावेळी यूट्यूब चॅनलवर हा चित्रपट रिलीज केला त्याच्या काही मिनिटांत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि गोंधळ उडाला. आश्चर्य म्हणजे चित्रपट यूट्यूबवर रिलीज केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत ३२ हजार पेक्षा जास्त व्ह्यूव्स मिळाले.
काही मिनिटानंतर यूट्यूबवरून काढून टाकला चित्रपट
‘राधे’ चित्रपट यूट्यूबवर आल्याचं कळताच अनेक युजर्सनी यूट्यूबवर सर्चींग सुरू केलं. अनेकांनी हा चित्रपट पहायला सुरवात देखील केली. जशी ही बातमी सगळीकडे पसरली त्यानंतर कायद्याच्या कचाट्यात अडकण्याच्या भितीने ताबडतोब हा चित्रपट यूट्यूबवरून काढून टाकण्यात आला. तुम्ही आता जर हा चित्रपट यूट्यूबवर सर्च केला तर तो उपलब्ध होणार नाही.
गेल्या काही दिवसांपासून ‘राधे’ चित्रपटाची इज्जत वाचवण्यासाठी भलत्याच अॅक्शन मुडमध्ये दिसून येतोय. एकीकडे नकारात्मक समिक्षा करणारा अभिनेता केआरकेवर मानहानीचा दावा ठोकण्याच्या अॅक्शनमध्ये असणारा सलमान आता यूट्यूबवर लीक करणाऱ्यांवर काय अॅक्शन घेतोय, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.