बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा आज ५६ वा वाढदिवस. पण वाढदिवसाच्या एकच दिवस अगोदर सलमानला त्याच्या पनवेल येथील फार्महाऊसवर सर्पदंश झाल्यानंतर सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा झाली. सर्पदंशानंतर सलमान ठीक असून याची माहिती त्यानं स्वतःच सोशल मीडियावरून दिली. पण सलमानला सर्पदंश झाल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी धम्माल मीम्स शेअर केले.

सलमान खानला बिनविषारी साप चावल्यानंतर त्याच्यावर लगेच उपचार करण्यात आले आणि त्यानंतर सलमाननं आपली तब्येत ठीक असल्याची माहिती ट्विटरवरून दिली. एवढंच नाही तर त्यानंतर त्यानं वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशनही केलं. पण ही संधी सोडतील ते नेटकरी कसले. त्यांनी तर सलमानला सर्पदंश झाल्यानंतर धम्माल मीम्स शेअर केले आहेत. सोशल मीडियावर अक्षरशः मीम्सचा पाऊस पडला आहे. काहींनी या घटनेचा संदर्भ सलमाननं केलेल्या काळवीटाच्या शिकारीशी देखील जोडला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शनिवारी रात्री अभिनेता सलमान खानला सापाने दंश केला होता. सलमान खान त्याच्या पनवेल येथील फार्महाऊसवर उपस्थित होता. ख्रिसमस साजरा करण्यासाठी तो फार्महाऊसवर आला असताना ही घटना घडली. यानंतर रात्री उशिरा सलमान खानला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर सलमान खानला रुग्णालयातून डिस्चार्च देण्यात आला.