अभिनेता सलमान खानचं ‘हिट अँड रन’ हे सर्वात सर्वाधिक वादग्रस्त आणि हाय-प्रोफाइल प्रकरण मानलं जातं. जेव्हा या प्रकरणात सर्व बाजूंनी अपयश येत होतं त्यावेळी वकील श्रीकांत शिवडे यांनी ही केस सांभाळली होती. एवढंच नाही तर ही कायदेशीर लढाई श्रीकांत शिवडे यांच्यामुळेच सलमाननं जिंकली. सलमानचे वकील श्रीकांत शिवडे यांच वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झालं आहे.

सलमान खानचे वकील श्रीकांत शिवडे हे मागच्या बऱ्याच काळापासून ब्लड कॅन्सरशी झुंज देत होते. १९ जानेवारी २०२२ रोजी रात्री त्यांचं निधन झालं. श्रीकांत शिवडे यांच्याकडे काम करणाऱ्या एका वकीलांनी याची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितलं की, ‘श्रीकांत शिवडे मागच्या काही काळापासून ‘ल्यूकेमिया’ (ब्लड कॅन्सर)मुळे आजारी होते. त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू होते. पण उपचारा दरम्यान त्यांचं निधन झालं.’ याशिवाय रुग्णालयाच्या प्रतिनिधींनी, ‘क्लिनिकल हेमेटोलॉजिस्ट डॉ. समीर मेलिंकेरी हे श्रीकांत शिवडे यांच्यावर उपचार करत होते.’ अशी माहिती दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान सलमान खान व्यतिरिक्त त्यांनी अभिनेता शायनी आहूजाची केसही लढली होती. शायनी आहूजाला २००९ साली बलात्कार प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं होतं. श्रीकांत शिवडे यांनी केवळ सलमान खान आणि शायनी आहूजा यांच्यासाठीच नाही तर इतरही काही हाय- प्रोफाइल केसवर काम केलं आहे. श्रीकांत शिवडे यांच्या पश्चात त्यांची आई, पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे.