scorecardresearch

“२००१ मध्ये मला पहिल्यांदा…”, ‘Suicide Disease’शी झुंज देणाऱ्या सलमान खानने सांगितला ‘तो’ धक्कादायक अनुभव

मी गेल्या काही दिवसांपासून एका विचित्र प्रकारच्या मज्जातंतूच्या विकाराशी झुंज देत आहे.

अभिनेता सलमान खान आज बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता आहे. कोणतीही भूमिका असो सलमान त्याला पूर्णपणे न्याय देतो. सलमान खान हा सध्याचा सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीमधील एक आहे. सलमान हा फार व्यस्त अभिनेत्यांपैकी एक असला तरी तो त्याच्या फिटनेसची प्रचंड काळजी घेतो. मात्र सलमानला एकेकाळी एका विचित्र आजाराचा सामना करावा लागला होता. ट्राइगेमिनल न्यूरालजिया (Trigeminal Neuralgia) असे या विकाराचे नाव असून त्याला ‘सुसाइड डिसीज’ (Suicide Disease) या नावानेही ओळखले जाते.

सलमान खानने दुबईत ट्यूबलाईट चित्रपटाच्या गाण्याच्या रिलीजदरम्यान याबाबतचा खुलासा केला होता. यावेळी तो म्हणाला की, मी गेल्या काही दिवसांपासून एका विचित्र प्रकारच्या मज्जातंतूच्या विकाराशी झुंज देत आहे. त्यावर मी अमेरिकेत उपचार केले. मला ट्रायजेमिनल न्यूराल्जिया नावाच्या मज्जातंतूच्या समस्येने ग्रासले होते. यामुळे मला नीट बोलताही येत नव्हते. त्यामुळे मला खूप वेदना होत होत्या.

या विकारात इतक्या वेदना होतात की काही लोक यात आत्महत्याही करण्याचा विचार करतात. २००१ मध्ये मला पहिल्यांदा या आजाराबद्दल समजले. त्यावेळी माझ्या आवाजात एक विचित्र लवचिकता आणि कर्कशपणा आला होता. त्यावेळी मी नशेत नव्हतो. मी कधीही रमजानच्या महिन्यात दारु पीत नाही. माझा आवाज बदलण्यामागचे कारण हा आजार आहे. पण आता मी ठीक होत आहे. पण यामुळे मला माझ्या आरोग्याकडे लक्ष देण्याशिवाय कोणताही पर्याय नाही, असे सलमान म्हणाला.

सलमान खान हा लवकरच ‘टायगर ३’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘टायगर ३’ या चित्रपटाचे शूटींग हे १४ फेब्रुवारीपासून दिल्लीत सुरु झाले आहे. याचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले आहे.

“पुण्यात नेऊन माझी किडनी काढून घेतली तर…?” ‘झुंड’मधील बाबूने सांगितला ‘तो’ भन्नाट किस्सा

‘टायगर ३’ यात सलमान पुन्हा एकदा रॉ एजंटची भूमिका साकारताना दिसेल. तर कतरिना यात आयएसआय एजंट झोयाची भूमिका साकारणार आहे. यात आभिनेता इमरान हाशमी खलनायकेच्या भूमिकेत दिसेल. याआधी सलमान आणि कतरिनाने अली अब्बास जाफरच्या ‘भारत’या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. त्यामुळे त्यांचे चाहते त्यांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Salman khan once suffered from suicide disease trigeminal neuralgia nrp

ताज्या बातम्या