अभिनेता सलमान खान आज बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता आहे. कोणतीही भूमिका असो सलमान त्याला पूर्णपणे न्याय देतो. सलमान खान हा सध्याचा सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीमधील एक आहे. सलमान खान हा कोट्यावधी संपत्तीचा मालक आहे. सलमान खानच्या लग्नावरुन आतापर्यंत अनेक चर्चा रंगल्या आहे. सलमान खानचे नाव अनेक अभिनेत्रींशी आतापर्यंत जोडण्यात आले आहे. मात्र अद्याप तो अविवाहित आहेत.

सलमानने अद्याप लग्न केलेले नाही. जर भविष्यात सलमानने लग्न केले नाही तर मग त्याची कोट्यावधी संपत्ती कोणाला मिळणार? ती कोणाच्या नावे होणार? असे अनेक सवाल उपस्थित होत असतात. अनेकदा त्याच्या चाहत्यांनाही हा प्रश्न पडतो. मात्र काही वर्षांपूर्वी सलमानने स्वत: याबद्दलचा खुलासा केला होता.

एकदा सलमानला मुलाखतीदरम्यान लग्नाबद्दल आणि संपत्तीबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. यावेळी सलमानला त्याच्या मृत्यूनंतर संपत्तीचे काय होणार? असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना सलमान म्हणाला, “मी लग्न केले काय आणि नाही केले काय…माझ्या मृत्यूनंतर माझ्या संपत्तीतील अर्धा हिस्सा हा एका ट्रस्टला दान केला जाईल. तसेच जर मी लग्न केले नाही तर माझी पूर्ण संपत्ती ही त्या ट्रस्टच्या नावे केले जाईल. सलमानने काही वर्षांपूर्वी Being Human foundation नावाच्या एका ट्रस्टची स्थापना केली आहे. याच ट्रस्टला त्याच्या संपत्तीमधील हिस्सा दिला जाणार आहे.” असे त्याने स्पष्ट केले.

सलमान नेहमीच त्याच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारल की टाळाटाळ करत उत्तर देतो. येत्या काही वर्षात सलमानचा लग्नाचा काहीही प्लॅन दिसत नाही. त्यामुळे त्याची कोट्यावधींची संपत्ती ही ट्रस्टला दान केली जाईल, असे बोललं जात आहे. मात्र अद्याप याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

सलमान खानने वांद्र्यात भाड्याने घेतला ड्युप्लेक्स फ्लॅट; एका महिन्याचे भाडे तब्बल…

दरम्यान गेल्या महिन्यात सलमानने त्याच्या वांद्र्याच्या घराजवळच एक ड्युप्लेक्स फ्लॅट भाड्याने घेतला होता. याबाबतचा भाडे करार नुकताच समोर आला. एका रिअल इस्टेट पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार, सलमानने व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडने वांद्रे पश्चिमेकडील मकबा हाईट्स या टॉवरमध्ये एक फ्लॅट भाड्याने घेतला आहे. हा ड्युप्लेक्स फ्लॅट असून तो १७ आणि १८ व्या मजल्यावर आहे. नुकतंच याबाबतचे भाडे करारपत्र समोर आले आहे. हा फ्लॅट मालिक बाबा सिद्दीकी आणि झिशान सिद्दीकी यांचा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या फ्लॅटचा कार्पेट एरिया हा २ हजार २६५ स्के.फूट इतका आहे. सलमानने ११ महिन्यांसाठी हा फ्लट भाड्याने घेतला आहे. यासाठी त्याला दर महिना 8.25 लाख रुपये भाडे द्यावे लागणार आहे. सलमानने भाड्याने घेतलेला हा फ्लॅट त्याच्या कंपनीच्या कामासाठी घेतल्याचे बोललं जात आहे.