बॉलिवूड अभिनेता सलमान खानची प्रमुख भूमिका असलेला सनम बेवफा या चित्रपटाला ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. १९९१ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट त्यावेळी चांगलाच गाजला होता. या चित्रपटात सलमानसोबत अभिनेत्री चांदनी हिने स्क्रीन शेअर केली होती. त्याकाळी चांदनीच्या अभिनयासह सौंदर्याची प्रचंड चर्चा झाली होती. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. पण त्यानतंर तिचे सर्वच चित्रपट फ्लॉप झाले आणि त्यानंतर ती गायब झाली.

चांदनीने बॉलिवूडमधील करिअरला कायमचा रामराम केला. पण तरीही ती सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. ती नेहमी तिचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. नुकंतच नवीन वर्षाच्या निमित्ताने चांदनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तिचा एक फोटो शेअर केला आहे.

चांदनीचे खरे नाव नवोदिता शर्मा असे आहे. ती परदेशात नृत्य प्रशिक्षक आहे. ऑर्लेंडोमध्ये तिचा स्वत:चा डान्स क्लास आहे. त्यासोबत तिने अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरील डान्स शोमध्ये सहभाग घेतला आहे.

चांदनी म्हणजेच नवोदित शर्मा गेल्या ३० वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. पण आजही ती तितकीच सुंदर आणि ग्लॅमरस दिसते. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला तिने इंस्टाग्रामवर तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत. यात तिचे चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. नवोदिताने हे फोटो शेअर करत त्याला हटके कॅप्शन दिले आहे.

“ती दुसऱ्या पिढीची आंटी”, ऐश्वर्या राय बच्चन आणि सोनम कपूर यांच्यातील भांडणाचा ‘तो’ किस्सा माहितीये का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावर ती म्हणाली, बाय २०२१, हाय २०२२. तिच्या या फोटोंवर अनेक लाईक्स आणि कमेंट पाहायला मिळत आहे. यावर तिच्या अनेक चाहत्यांनी मस्त, सुंदर अशा कमेंट केल्या आहेत. नवोदित शर्माने १९९६ मध्ये सतीश शर्मासोबत लग्न केले. त्यानंतर ते दोघेही अमेरिकेत स्थायिक झाले. त्यांना दोन मुली आहेत. ज्यांची नावे करिश्मा आणि करीना आहेत.