बॉलिवूड अभिनेता सलमान खान सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. इन्स्टाग्रामवर सलमान खानचा बराच मोठा चाहता वर्ग आहे. अनेकदा त्याच्या सोशल मीडिया पोस्ट चर्चेचा विषय ठरतात. आताही असंच काहीसं घडलं आहे. सलमाननं नुकताच त्याच्या इन्स्टाग्रामवर त्याच्या आईसोबतचा एक सेल्फी शेअर केला आहे. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. विशेषतः या फोटोला सलमाननं दिलेलं कॅप्शन चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे.
सलमान खानचा ‘टायगर ३’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगचं शेवटचं शेड्युल बाकी आहे. त्यापूर्वी सलमान घरीच त्याच्या आईसोबत काही वेळ व्यतित करत असल्याचं त्याच्या सोशल मीडिया पोस्टवरून दिसून येत आहे. सलमाननं इन्स्टाग्रामवर नुकताच त्याच्या आईसोबतचा एक सेल्फी शेअर केला. ज्यात ती आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेला दिसत आहे. हा फोटो शेअर करताना त्यानं त्याला साजेसं कॅप्शनही दिलं.
इन्स्टाग्रामवर आईसोबतचा सेल्फी शेअर करताना त्याला दिलेलं कॅप्शन सर्वांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे. सलमाननं या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘आईच्या मांडीवर… स्वर्ग’ सलमानच्या या पोस्टचं सोशल मीडियावर बरंच कौतुक होताना दिसत आहे. त्याच्या या फोटोवर कमेंट्स आणि लाइक्सचा अक्षरशः पाऊस पडताना दिसत आहे.
दरम्यान सलमान खानच्या कामाबद्दल बोलायचं तर तो लवकरच कतरिना कैफसोबत ‘टायगर ३’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगचं १५ दिवसांचं शेड्युल बाकी आहे आणि हे शूटिंग दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ होणार आहे. याशिवाय सलमान खान जॅकलिन फर्नांडिससोबत ‘किक २’ आणि पूजा हेगडेसोबत ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.