दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू सध्या यशाच्या शिखरावर आहे. आपल्या चित्रपटांमुळे आणि इतर वेगवेगळ्या कारणांमुळे ती नेहमीच चर्चेत असते. याशिवाय मागच्या काही काळापासून ती हिट गाणी आणि नुकत्याच झालेल्या घटस्फोटामुळेही चर्चेत आहे. समांथाने ‘पुष्पा’ चित्रपटात ‘ऊं अंटवा’ हे सुपरहिट आयटम साँग दिलं होतं. ज्याची बरीच चर्चा झाली होती. काही दिवसांपूर्वीच तिने अक्षय कुमारसोबत करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये हजेरी लावली आहे. आता समांथा तिने विकत घेतलेल्या नव्या घरामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

समांथा रुथ प्रभूने हैदराबादमध्ये नुकतंच एक आलिशान घर खरेदी केलं आहे. हे घर तिच्यासाठी वेगवेगळ्या कारणांनी खास आहे. समांथा पूर्वी तिचा पूर्वश्रमीचा पती नागा चैतन्यसोबत याच घरात राहत होती. या घराच्या मालकाने अलीकडेच सांगितले केले की, जोडप्याने वेगळे झाल्यानंतर हे घर विकले होते. पण त्यानंतर अभिनेत्रीने मालकाशी बोलून ते घर स्वतः विकत घेतले. सध्या ती तिच्या आईसोबत तिथे राहते.

आणखी वाचा- आमिर खानने नागा चैतन्यला दिला होता सामंथापासून घटस्फोट घेण्याचा सल्ला?

अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर समांथाने करिअरमध्ये अभिनेत्रीने मोठी उंची गाठली आहे. तिने करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये खुलासा केला होता की, अभिनय हा तिच्या करिअर नियोजनाचा भाग नव्हता. तिला कधीच अभिनेत्री व्हायचं नव्हतं. पण घरची परिस्थिती बेताची असल्याने तिला आपले शिक्षण पूर्ण करता आले नाही. तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आणि दमदार अभिनयाच्या जोरावर सुपरहिट चित्रपट दिले. आज समांथा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान समांथाच्या कामाबद्दल बोलायचं तर ती आगामी काळात ‘शाकुंतलम’, ‘कुशी’ आणि ‘यशोदा’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. सध्या या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. याशिवाय लवकरच ती बॉलिवूड चित्रपटांमध्येही दिसणार असल्याचं बोललं जातंय.