समांथा रुथ प्रभूचे वडील जोसेफ प्रभू यांचे निधन झाले आहे. या दु:खद बातमीची माहिती समांथाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे दिली. तिने लिहिले, “पुन्हा भेट होईपर्यंत बाबा…” आणि तिने बरोबर तुटलेल्या हृदयाचा इमोजी टाकला आहे.

समांथाचे वडील, तेलुगू अँग्लो-इंडियन होते. समांथाच्या आयुष्यात आणि तिच्या जडणघडणीत तिच्या वडिलांचा मोठा वाटा होता. व्यावसायिक व्यग्रतेनंतरही समांथा अनेकदा तिच्या कुटुंबाबद्दल प्रेमाने बोलत असे आणि तिच्या मनोरंजन क्षेत्रातील प्रवासात त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत असे. तिच्या वडिलांच्या निधनाची बातमी ऐकून समांथाचे चाहते सोशल मीडियावर समांथाच्या सांत्वनासाठी पोस्ट करीत आहेत.

हेही वाचा…‘या’ अभिनेत्रीने ९० च्या दशकात केलेलं बोल्ड फोटोशूट; आईने पाहिल्यावर केलेलं असं काही की…, तिनेच केला खुलासा

अलीकडेच समांथाने तिच्या वडिलांशी असलेल्या नात्याबद्दल वक्तव्य केले होते. ‘गलाटा इंडिया’ या माध्यमाला दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या वडिलांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या.

samantha ruth prabhu father died
समांथा रुथ प्रभूचे वडील जोसेफ प्रभू यांचे निधन झाले आहे. या दु:खद बातमीची माहिती समांथाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे दिली. (Photo Credit – Samantha Ruth Prabhu)

ती म्हणाली, “लहानपणापासून मला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी सतत लढावे लागले. बहुतेक भारतीय पालक असतात, तसेच माझे वडील होते.” तिने सांगितले की, तिचे वडील तिच्या क्षमतांना कमी लेखायचे. समांथा म्हणाली, “त्यांनी मला सांगितले, ’तू खूप हुशार नाहीस. ही फक्त भारतीय शिक्षणाची पद्धत आहे. त्यामुळे तुलाही पहिला क्रमांक मिळू शकतो.’ त्यामुळे मला बराच काळ मला वाटत राहिले की, मी हुशार नाही.”

हेही वाचा…यामी गौतमच्या सहा महिन्यांच्या मुलाची पहिली झलक आली समोर, पती आदित्य धर पोस्ट शेअर करत म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑक्टोबर २०२१ मध्ये समांथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य हे विभक्त झाले. त्यानंतर जवळपास एक वर्षाने समांथाचे वडील जोसेफ प्रभू यांनी समांथा व नागा चैतन्य यांच्या लग्नातील काही जुने फोटो फेसबुकवर शेअर केले आणि त्याविषयी ते व्यक्त झाले. त्यांनी लिहिले होते की, या घटनेस स्वीकारायला त्यांना खूप वेळ लागला आणि त्यांनी नवीन अध्याय सुरू करण्याची आशा व्यक्त केली होती.