दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभूचा ‘शाकुंतलम’ चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला, पण चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. मागच्या काही महिन्यात समांथाचे ‘यशोदा’, ‘शाकुंतलम’ चित्रपट आले, पण चित्रपट चालले नाहीत. अशातच समांथाचं करिअर संपलं आहे, असा दावा एका चित्रपट निर्मात्याने केला आहे.

दिग्गज निर्माते आणि दक्षिण चित्रपटांचे दिग्दर्शक त्रिपुरानेनी चिट्टीबाबू यांनी समांथाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. “समांथाचं चित्रपटांमधील करिअर संपलं आहे, आता तिला पुन्हा स्टारडम मिळू शकत नाही,” असं ते म्हणाले. ‘फिल्मबीट’च्या वृत्तानुसार, चित्रपटाच्या प्रमोशनची समांथाची पद्धत पाहून त्रिपुरानेनी चिट्टीबाबू यांनी हा दावा केला आहे. समांथा तिच्या आजारपणाचा वापर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी करत आहे, असं म्हटलं जातंय. यावर एका मुलाखतीत प्रतिक्रिया देताना चिट्टीबाबू यांनी हे वक्तव्य केलं.

पहिल्यांदा पाळी आल्यावर वडिलांनी केलेली मदत, सुंबुल तौकीर खुलासा करत म्हणाली, “मला शारीरिक बदलांबाबत…”

‘शाकुंतलम’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान समांथा भावुक झाली होती. याबद्दल विचारल्यावर प्रतिक्रिया देताना चिट्टीबाबू म्हणाले, “तिचं रडणं खोटं होतं. शकुंतला बनण्यासाठी तिला काय काय सहन करावं लागलं, ते ती सांगत होती. पण सर्वच कलाकार भूमिका साकारण्यासाठी मेहनत घेतात. ‘यशोदा’च्या प्रमोशनवेळीही तिने असंच केलं होतं. हे योग्य नाही. हा फक्त सहानुभूती मिळविण्याचा हा एक मार्ग आहे. कठोर परिश्रम करणे हा तुमच्या कामाचा भाग आहे. भूमिकेला न्याय देण्यासाठी कोणत्याही थराला जाणारे असे अनेक कलाकार आपण पाहिले आहेत. पण समांथाने त्यासाठी सहानुभूती घेऊ नये, हा स्वस्तातरी प्रसिद्धी मिळवण्याचा भाग आहे.”

View this post on Instagram

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्रिपुरानेनी चिट्टीबाबू पुढे म्हणाले, “समंथाचे वजन कमी झाले असून तिचा चेहराही बदलला आहे. ती आजारी पडली आणि आता प्रत्येक चित्रपटासाठी नाटक करत आहे. तिचं करिअर संपलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले सामंथाचे फोटो आणि व्हिडीओ हे सर्व प्रसिद्धीसाठी होते. असे अनेक अभिनेते आहेत, ज्यांनी आजारपणात, ताप असतानाही अभिनय केला आहे, पण त्यांनी प्रमोशनमध्ये असं कधीच सांगितलं नाही. सामंथाने तिचं स्टारडम गमावलं आहे. ती एक सुपरस्टार होती आणि तिने यशाचे शिखर पाहिले आहे. आता तिला पुढे जायचंय, त्यामुळे ती असं वागत आहे. पण तिने स्वस्त प्रसिद्धीसाठी आजारपणाचा वापर करू नये. भावनिक होऊन लोक चित्रपट पाहत नाहीत.”

दरम्यान, नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतल्यानंतर समांथा रुथ प्रभू करिअरवर फोकस करत आहे. घटस्फोटानंतर गेल्यावर्षी तिने मायोसिटिस नावाचा आजार झाल्याची माहिती दिली होती. त्या आजारामुळे तिच्या दिसण्यावरही परिणाम झाला आहे. या आजाराबद्दल बोलताना ती बऱ्याचदा भावुक झाल्याचंही पाहायला मिळालं होतं.