समांथा रुथ प्रभू व नागाचैतन्य ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी होती. आदर्श कपल म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. २०१७मध्ये लग्नाच्या बेडीत अडकलेली लोकप्रिय जोडी चार वर्षांतच घटस्फोट घेत वेगळी झाली. २०२१ मध्ये नागाचैतन्य व समांथाने घटस्फोट घेतल्यानंतर चाहत्यांनाही जबर धक्का बसला होता. समांथाबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर जवळपास वर्षभरानंतर नागाचैतन्य प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत.

नागाचैतन्यचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये बॉलिवूड अभिनेत्री शोभिता धुलिपालाही दिसत होती. या फोटोनंतर नागाचैतन्य शोभिता धुलिपाला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. नागाचैतन्याच्या डेटिंगच्या चर्चांवर त्याची पूर्वाश्रमीची पत्नी व प्रसिद्ध अभिनेत्री समांथाने मौन सोडलं आहे. समांथाने एका मुलाखतीत यावर भाष्य केलं आहे.

हेही वाचा>> Video: “हर हर शंभो” म्हणताच भारती सिंहच्या लेकाने काय केलं पाहा; व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले…

हेही वाचा>> सलमान खानच्या ‘त्या’ फोटोवर एक्स गर्लफ्रेंडची कमेंट, चाहते म्हणाले “पहिलं प्रेम…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समांथा म्हणाली, “कोण कोणाबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे, या गोष्टीमुळे मला फरक पडत नाही. ज्या व्यक्तींना प्रेमाची किंमत नसते त्यांनी कितीही लोकांना डेट केलं तरी शेवटी डोळ्यांत अश्रूच येतात. त्याने त्या मुलीला तरी आनंदी ठेवलं पाहिजे. स्वभाव बदलून मुलीच्या भावना न दुखावता त्याने तिची काळजी घेतली, तर हे सगळ्यांसाठीच चांगलं आहे.”

हेही वाचा>> परिणीता चोप्रा-राघव चड्ढा यांची लगीनघाई! दिल्लीत सुरू आहे साखरपुड्याची जय्यत तयारी

समांथा तिच्या आगामी शंकुतलम या चित्रपटामुळे चर्चेत आहे. येत्या १४ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हिंदी, तमिळ, मल्याळम व कन्नड अशा चार भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.