दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री समांथा रुथ प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्यने काही दिवसांपूर्वी घटस्फोट घेतला. त्यांच्या घटस्फोटाचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यांच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला होता. पण घटस्फोटानंतरचा काळ हा समांथासाठी फार कठीण असल्याचे तिने एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे. आता तिला स्वत:चा अभिमान वाटत आहे.

समांथाने नुकतंच फिल्मफेअरला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने खासगी आयुष्यावर वक्तव्य केले. ‘तुमचा दिवस वाईट असेल तर ठिक आहे. पण तुम्ही काम करताना ते स्वीकारायला हवे. पण जर तुम्ही ते स्वीकारले नाही आणि तो चांगला होण्यासाठी सतत भांडत राहिलात तर ती लढाई तुम्ही कधीही जिंकणार नाहीत. येत्या काळात मला वैयक्तिक अडचणी, समस्यांना सामोरे जावे लागणार आहे, याची मला कल्पना आहे आणि मी त्यासाठी खंबीर आहे, याचा मला अंदाज येत आहे’ असे समांथा म्हणाली.
आणखी वाचा : हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खानला डेट करण्यावर बॉयफ्रेंडची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…

पुढे ती म्हणाली, ‘मला असे वाटले होते की मी मानसिकदृष्ट्या मला त्रास होईल. नागा चैतन्यला घटस्फोट दिल्यानंतर मी खचून जाईन आणि मरेन असे मला वाटले होते. मी या सगळ्या गोष्टींचा समान करु शकते असे कधी वाटलेच नव्हते. आज मला स्वत:चा अभिमान वाटतो. कारण मी या सर्व गोष्टींचा स्वत:वर परिणाम होई दिला नाही.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समांथा लवकरच तेलुगू चित्रपट शकुंतलम आणि तमिळ चित्रपट काठू वकालु रेंदु कधालमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाच समांथा रुथ प्रभू सुपरस्टार विजय सेतुपतीसोबत दिसणार आहे. तसेच ती राज एण्ड डीके यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. एका वेब सीरिजचे समांथा चित्रीकरण सुरु करणार असल्याचे म्हटले जाते.