बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान यांची जोडी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक होती. जेव्हा त्यांचा घटस्फोट झाल्याची बातमी समोर आली तेव्हा हृतिकच्या चाहत्यांना धक्काच बसला होता. लग्नाच्या १४ वर्षांनंतर त्यांचा घटस्फोट झाला. मात्र, सुझान आता तिच्या आयुष्यात मुव्हऑन झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ती अर्सलन गोणीला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. आता स्वत: अर्सलनने यावर वक्तव्य करत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

काही दिवसांपूर्वी अर्सलन आणि सुझान गोव्याहून वेगवेगळ्या फ्लाइटने आल्याचे दिसले होते. त्यानंतर आता ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये अर्सलनने सुझानसोबतच्या नात्यावर पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. ‘सोशल मीडियावर अनेकदा विनोद केले जातात. आम्ही फक्त एका मित्राच्या बर्थडे पार्टीला गेलो होतो. सर्वजण आपापल्या मित्रांच्या वाढदिवसाच्या पार्ट्यांमध्ये सहभागी होऊ शकतात ना? लोक नेहमी चर्चा करतात आणि यासर्वाला कसे सामोरे जायचे हे देखील आम्हाला माहिती आहे. आम्ही याकडे लक्ष देत नाही’ असे अर्सलन म्हणाला.
आणखी वाचा : सलमानसोबतच एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरलाही कतरिनाने दिले नाही लग्नाचे आमंत्रण?

पुढे तो म्हणाला, ‘सुझान आणि माझ्यात खूप चांगले मैत्रीचे नाते आहे. आमची भेट एका कॉमन फ्रेंडच्या घरी झाली होती. आम्ही आमच्या मित्र परिवारासोबत नेहमी फिरत असतो. सुझान ही खूप चांगली आहे.’

ऑक्टोबर महिन्यात जेव्हा सुझानने तिचा वाढदिवस साजरा केला तेव्हा तिच्यासोबत अर्सलन देखील होता. तिच्या वाढदिवसाच्या व्हिडीओ आणि फोटोमध्ये अर्सलन असल्याचे पाहायला मिळाले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हृतिक आणि सुझानचा २०१४ मध्ये घटस्फोट झाला. पण मुलांसाठी ते दोघे नेहमी एकत्र येताना दिसतात. सध्या सुझान अर्सलनला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. अर्सलन अल्ट बालाजीच्या ‘मैं हीरो बोल रहा हूं’ या सीरिजमध्ये दिसला होता. यात त्याने खलनायकाची भूमिका साकारली होती.