दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय कपल अभिनेत्री समांथा आणि नागाचैतन्य यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया पोस्टद्वारे घटस्फोट घेतल्याचं जाहीर केलं होतं. त्यांच्या या निर्णयानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. या दोघांनी घटस्फोटाचं कारण स्पष्ट केलं नसलं तरी यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाणं आलं आहे. समांथा एका डिझायनर प्रीतम जुकलकरला डेट करत असल्याचे बोललं जात आहे. यावरुन समांथावर अनेक आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. मात्र नुकतंच प्रीतम जुकलकरने या सर्व प्रकरणावर भाष्य केले आहे. “समांथाला मी माझी बहिण मानतो,” असे प्रीतमने सांगितले आहे.

समांथा आणि नागाचैतन्यच्या घटस्फोटानंतर तिचे आणि प्रीतमचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या दोघांचे अफेअर चालू आहे, असा चर्चाही सध्या रंगल्या आहेत. यामुळे समांथाने नागाचैतन्यसोबत घटस्फोट घेतला असावा, असे तर्कविर्तकही लढवले जात आहे. मात्र याबाबत समांथा किंवा नागाचैतन्यने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

पण नुकतंच प्रीतम जुकलकरने या प्रकरणी खुलासा केला आहे. प्रीतम जुकलकरने टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना याप्रकरणावर भाष्य केले. यावेळी प्रीतम जुकलकर म्हणाला, “इंडस्ट्रीमध्ये प्रत्येकालाच माहिती आहे की, मी समांथाला ‘जीजी’ या नावाने आवाज देतो. ‘जीजी’ या शब्दाचा अर्थ ‘बहीण’ असा होतो. मग आमच्या दोघांमध्ये कसे काही असू शकते,” असा सवाल त्याने विचारला.

“पण या प्रकरणावरुन मी नागाचैतन्यावर नाराज आहे. कारण त्याच्या एका स्पष्टीकरणामुळे या अफवा रोखता येऊ शकतात. कारण नागाचैतन्यला माझे आणि समांथाचे नाते माहित आहे,” असेही प्रीतम म्हणाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मी नागाचैतन्यला गेल्या अनेक वर्षापासून ओळखतो. समांथा आणि माझे नाते काय आहे, हे नागाचैतन्यला माहिती आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर नागाचैतन्यने स्पष्टीकरण दिले तर लोक अशा अफवा पसरवणार नाहीत. त्यामुळे जर नागाचैतन्यने याप्रकरणी काही टिप्पणी केली तर मला फार फरक पडेल. सध्या अनेक तथाकथित चाहते अशाप्रकरची विधानं करुन खोट्या अफवा पसरवत आहेत. त्यामुळे नागाचैतन्याने याबद्दल वक्तव्य करुन या सर्वांची तोंड बंद करायला हवीत,” असेही प्रीतमने सांगितले.