Sidharth Shukla funeral: सिद्धार्थच्या अंतिम संस्कारावेळी संभावनाचा पोलिसांसोबत वाद?

सिद्धार्थ शुक्ला अखेरचा निरोप देण्यासाठी अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी गर्दी केली होती. बिग बॉसची माजी स्पर्धक संभावना सेठ सुद्धा पतीसोबत आली होती. यावेळचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

sambhavna-seth-viral-video (1)

अभिनेता सिद्धार्थ शुक्लावर काल मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. 40 वर्षीय सिद्धार्थचं गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. सिद्धार्थचा मृतदेह कुटुंबीयांना दुपारी 1 वाजता उशिरा मिळाल्यानं त्याच्यावरील अंतिम संस्कार प्रक्रियेला देखील विलंब झाला. त्यानंतर त्याच्यावर ओशिवारा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या लाडक्या अभिनेत्याला निरोप देण्यासाठी त्याच्या शेवटच्या प्रवासात अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी गर्दी केली होती. बिग बॉसची माजी स्पर्धक आणि भोजपुरी अभिनेत्री संभावना सेठ सुद्धा पती अविनाश सोबत तिथे पोहोचली होती. यावेळचा तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या अंतिम संस्कार प्रसंगी उपस्थित असलेल्या अभिनेत्री संभावना सेठचा ओशिवरा स्मशानभूमीमधला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. यात अभिनेत्री संभावना सेठ पोलिसांसोबत वाद घालताना दिसून येतेय. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री संभावना सेठला ओशिवरा स्मशानभूमीवर ड्यूटीवर असलेले पोलिस तिला आत जाण्यास विरोध करताना दिसून येत आहेत.

पती अविनाशचा गळा पडकत होते

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओ संदर्भात एका आज तकसोबत बातचीत करत असताना अभिनेत्री संभावना सेठने प्रतिक्रिया दिलीय. यावेळी बोलताना अभिनेत्री संभावना सेठ म्हणाली, “सिद्धार्थचे कुटुंबीय मला घेण्यासाठी येतच होते. त्यामुळे तिथल्या पोलिसांनी तर मला आत जाऊ दिलं. पण माझे पती अविनाशचा त्यांनी थेट गळाच पडकला. विचार करा ना, जेव्हा कुटुंबीय मला आत घेण्यासाठी जर येत असतील तर मग तुम्ही कोण आहात ? त्याचा गळा पकडणारे…मग त्यावेळी माझा राग अनावर झाला. मी माझ्या पतीसोबत चुकीचं होत असताना थोडी पाहू शकते? मग ते कुणीही असो.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Love Status (@aaj_kalover)

प्रोटोकॉलनुसार अर्धा तास बाहेर वाट पाहिली

यापुढे बोलताना अभिनेत्री संभावना सेठ म्हणाली, “यात आम्ही चुकीचे नव्हतो. आम्ही तिथे बाहेर उभं राहून वाट पाहत होतो. जेव्हा आम्हाला बोलवलं गेलं तेव्हाच आम्ही आत जात होतो. आम्ही तिथे काही जबरदस्ती आत शिरण्याचा प्रयत्न करत नव्हतो. आम्ही जवळजवळ अर्धा तास बाहेर वाट पाहिली. पण जेव्हा अविनाशसोबत चुकीचं वर्तन केलं, मग माझा पारा चढला. तुम्ही व्हिडीओ पहा. त्यात सारं काही स्पष्ट दिसेल. अखेरला पोलिसांनी सॉरी म्हणत माफी पण मागितली.”

कित्येक सेलिब्रिटी आत न जाताच परतले

अभिनेत्री संभावना सेठ म्हणाली, “आम्ही आत गेलो होतो. ती काही योग्य वेळ नव्हती वाद घालण्याची. जर कुणी प्रोटोकॉल पाळत नसेल तर तुम्ही त्यांना पकडा ना. आम्हाला बोलवण्यासाठी तर आतुन कुटुंबीय आले होते. बाहेर खूप सेलिब्रिटी उभे होते. त्यांना तर आत जाऊच दिलं नाही. ते बिचारे वाट पाहून सिद्धार्थचं अंतिम दर्शन न करताच परतले.”

सिद्धार्थने कॉल करून भेटू एकदा सांगितलं होतं

यावेळी अभिनेत्री संभावना सेठने सिद्धार्थच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी बोलताना अभिनेत्री संभावना सेठ म्हणाली, “सिद्धार्थ शुक्ला जेव्हा बिग बॉसमध्ये होता, त्यावेळी मी त्याला खूप सपोर्ट केला होता. याचेच आभार मानण्यासाठी त्याने मला एकदा कॉल केला होता. त्यावेळी बोलताना तो भेटू नक्की असं म्हणाला होता. त्यानंतर आमची अशी भेट होईल कधी वाटलं नव्हतं.”

शेहनाज जोरजोात ओरडत होती

अभिनेत्री संभावना सेठने आत गेल्यानंतर तिथली परिस्थिती देखील शेअर केली. यावेळी बोलताना अभिनेत्री संभावना सेठ म्हणली, “सिद्धार्थवर अंतिम संस्कार सुर असताना शेहनाज खूपच तुटून गेली होती. खूपच वाईट परिस्थिती झाली होती तिची, शब्दात सांगता येणार नाही, इतकी वाईट अवस्था झाली होती. शेहनाज खूप जोरजोरात ओरडत होती आणि सिद्धार्थला हाका मारत होती.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sambhavna seth on viral video during sidharth shukla funeral prp