संजय दत्त आणि मान्यता दत्त यांची मुलगी इकरा दत्तचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये इकरा दत्तची स्टाईल, चेहऱ्याचा रंग आणि तिचे डोळे पाहून लोकांना तिची आजी नर्गिस दत्त यांची आठवण येत आहे.
व्हिडीओमध्ये इकरा कॅज्युअल टी-शर्ट आणि शॉर्ट्समध्ये दिसत आहे. पापाराझींसमोर ती अजिबात घाबरलेली नाही. असे दिसते की तिला कॅमेराला तोंड देण्याची सवय आहे. सर्वात जास्त चर्चा होत असलेली गोष्ट म्हणजे इकराचे डोळे आणि नाजूक चेहऱ्याचा रंग, जो नर्गिस दत्त यांच्या आठवणींना उजाळा देत आहे.
नेटकरी काय म्हणत आहेत?
व्हिडीओवर कमेंट करून नेटकरी ज्येष्ठ अभिनेत्री नर्गिस दत्त यांची आठवण काढत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, “असे दिसते की नर्गिसजी परत आल्या आहेत.” दुसऱ्याने विनोदाने म्हटले, “काही मुलांना डीएनए चाचणीची आवश्यकता नसते…” तर दुसऱ्याने तिचे कौतुक केले, “ती खूप सुंदर दिसत आहे,” असे म्हटले.
इकरा दत्तचा जन्म २१ ऑक्टोबर २०१० रोजी झाला. तिला एक जुळा भाऊ शाहरानदेखील आहे. इकरा तिची आई मान्यता आणि भावाबरोबर दुबईमध्ये राहते. ती तिथल्या एका आंतरराष्ट्रीय शाळेत शिकत आहे. कोविड-१९ लॉकडाऊनपूर्वीच संजय दत्तचे कुटुंब दुबईला स्थलांतरित झाले होते.
संजय त्याच्या करिअरपेक्षा पर्सनल लाइफमुळे जास्त चर्चेत राहिला. संजय दत्तच्या आयुष्यात अनेक मुली येऊन गेल्या हे सगळ्यांनाच माहीत आहे. अभिनेत्याचं पहिलं लग्न रिचा शर्माशी झालं होतं. यानंतर संजू बाबा १९९८ मध्ये दुसऱ्यांदा मॉडेल रिया पिल्लेसह लग्नबंधनात अडकला होता. या दोघांचा दहा वर्षांचा संसार २००८ मध्ये मोडला. याचवेळी संजयच्या आयुष्यात मान्यताची एन्ट्री झाली होती. संजय व मान्यता २००८ मध्येच लग्नबंधनात अडकले.
मान्यता ही संजयच्या आयुष्यात केवळ आलीच नाही तर तिने आजन्म त्याला साथ देण्याचा निर्धार केला. संजयच्या पडत्या काळातही मान्यता त्याच्याबरोबर ठामपणे उभी होती. गेले १७ वर्षे हे दोघंही सुखाने संसार करत आहेत. मान्यता ही संजय दत्तपेक्षा १९ वर्षांनी लहान आहे. ती मुस्लीम कुटुंबातील असून तिचे खरे नाव दिलनवाज शेख आहे.