बॉलिवूड अभिनेता संजय दत्तच्या सुटकेमुळे चाहत्यांप्रमाणेच त्याच्या मित्र परिवारातदेखील आनंदाचे वातावरण आहे. सध्या तो परिवारासोबत अनेक पार्ट्यांना उपस्थिती लावताना दिसत आहे. पार्टीतील संजयच्या उपस्थितीबरोबरच त्याची अनोखी केशरचना अनेकांचे लक्षवेधून घेत आहे. संजयदेखील आपली ही सोनेरी पोनीटेल मिरवताना नजरेस पडतो. तुरुंगवासाची शिक्षा भोगून आलेल्या संजय दत्तमध्ये शारीरिक आणि मानसिक स्तरावर चांगला बदल पाहायला मिळत असल्याचे त्याच्या निकटवर्तीयांकडून समजते. सोनेरी पोनीटेलमुळे संजय दत्तचे व्यक्तिमत्व उठून दिसत आहे. तुरुंगात असताना मिश्राजी नावाची व्यक्ती आपले केस कापत असे. त्यांनीच आपल्याला ही सोनेरी पोनीटेल स्वरुपातील हेअरस्टाइल दिल्याची माहिती नव्या केशरचनेची झलक दाखवत त्याने दिली.
व्यावसायिक पातळीवर बोलताना आपण दिग्दर्शक सिध्दार्थ आनंदच्या एका चित्रपटात काम करत असून, विधू विनोद चोप्रांबरोबर ‘मुन्नाभाई ३’ व्यतिरिक्त आणखी एक चित्रपट करत असल्याचे त्याने सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 21st Mar 2016 रोजी प्रकाशित
संजय दत्तच्या नव्या केशरचनेचे रहस्य
पार्टीतील संजयच्या उपस्थितीबरोबरच त्याची अनोखी केशरचना अनेकांचे लक्षवेधून घेत आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 21-03-2016 at 17:59 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay dutt reveals secret behind his new hairstyle