संजय दत्तची पहिली पत्नी रिचा शर्माचा वयाच्या ३३ व्या वर्षी ब्रेन ट्यूमरने मृत्यू झाला. पण संजय आणि रिचाची मुलगी त्रिशलाच्या मनात तिची आई अजूनही जिवंत आहे. अलिकडे त्रिशलाने आपल्या आईचे शेवटचे पत्र इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. तसेच तिने म्हटले आहे की, माझ्या आईने शेवटच्या घटका मोजत असताना तिने लिहिलेले पत्र मला मिळाले. ही २१ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझ्यात लिहिण्याची कला कुठून आली हे मला कळलंय. आयुष्य खूप लहान आहे. मला तिची खूप आठवण येतेय. ‘
त्रिशलाची आई रिचा शर्माने पत्रात लिहिले होते की, आपण सर्व एकत्र चालत असतो. प्रत्येकजण आपला मार्ग निवडतो. मीदेखील माझा मार्ग निवडलेला. पण मी आता या रस्त्यावर एकटीच पडले आहे. मी परत मागे कशी फिरू? मला पुन्हा एकदा संधी मिळेल का? वेळच सांगेल. जरी वेळ लागला तरी माझी थांबायची तयारी आहे. पण मलाही कुठेतरी माहित आहे की माझ्यासाठी आता कुठलाच मार्ग उरलेला नाही. तरीही मी आशा बाळगून आहे. माझी काळजी घेणारा देवदूत येईल आणि माझ्या स्वप्नांच्या दुनियेत मला घेऊन जाईल. माझी काळजी घेण्यासाठी तो बाहु पसरुन माझे स्वागत करीत आहे.
त्रिशाला केवळ दोन महिन्याची असताना रिचाचा ट्यूमरने मृत्यू झाला होता.
संग्रहित लेख, दिनांक 12th Mar 2016 रोजी प्रकाशित
संजय दत्तच्या पहिल्या पत्नीने मरण्यापूर्वी लिहलेले पत्र..
माझ्यासाठी आता कुठलाच मार्ग उरलेला नाही.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
Updated:

First published on: 12-03-2016 at 16:13 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay dutts daughter trishala shares her late mothers last hand written letter on instagram