स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार’ या डान्स रिअॅलिटी शोचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. गेल्या तीन महिन्यांपासून या मराठी डान्स शो प्रेक्षकांचे मनोरंजन करत होता. या शो च्या निमित्ताने अभिनेत्री संस्कृती बालगुडेने जवळपास १० वर्षांनंतर पुन्हा छोट्या पडद्यावर पदार्पण केले. संस्कृती ही या शोची सूत्रसंचालिका होती. दरम्यान हा कार्यक्रम संपल्यानंतर संस्कृतीने सोशल मीडियावर एक पोस्ट करत सर्वांचे आभार मानले आहेत.

संस्कृतीने हा कार्यक्रम संपल्यानंतर इन्स्टाग्रामवर एक मोठी पोस्ट लिहिली आहे. यात तिनेचॅनलचे, टीमचे, सहकलाकारांचे आणि प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. यावेळी ती फार भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे. या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये संस्कृतीने अंकुश चौधरीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

याला कॅप्शन देताना तिने म्हटले की, “मी या प्रवासाबद्दल लिहिण्यास सुरुवात केली की फार भावूक होते. पण आज मी याबद्दल लिहिणार आहे. असं म्हटलं जातं की एखादा चांगला काळ तुम्हाला कळण्याआधीच निघून जातो आणि त्याचप्रकारे ‘मी होणार सुपरस्टार’चे हे ३ महिने असेच गेले. हा शो संपल्याचं दुःख तर आहेच, पण या अविस्मरणीय प्रवासाचा एक छोटासा भाग होता आलं याचा आनंदही आहे.”

हेही वाचा : Photos: संस्कृतीच्या स्टायलिश फोटोंनी वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

“या शोच्या माध्यमातून मला माझ्यातील चांगले गुण, कला ओळखण्याची आणि दाखवण्याची संधी मिळाली. ज्या मी कधीच विसरू शकणार नाही. या शोचा संपूर्ण प्रवास शब्दांच्या पलीकडचा आहे,” असेही संस्कृतीने सांगितले.

विशेष म्हणजे संस्कृतीने स्टार प्रवाह मालिकेतील सर्वांचेच यानिमित्ताने आभार मानले आहे. या सर्वांना टॅग करत तिने आपल्यावर विश्वास दाखवल्याबद्दल आभार मानले आहेत. हा प्रवास या सर्वांच्या मदतीशिवाय अशक्य होता, असेही तिने म्हटले आहे.

हेही वाचा : “चांगला अभिनेता नाही झालास तरी चालेल पण….”, सुनील शेट्टीच्या मुलाचा वडिलांबद्दल खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष डान्सचा’ या कार्यक्रमात ‘दी लायन्स क्रू,’ ‘विजय-चेतन,’ ‘नेहुल-समीक्षा’ आणि ‘मायनस थ्री’ या चौघांमध्ये अंतिम लढत झाली. यात नेहुल-समीक्षा ही जोडी महाविजेता ठरली. तर लायन्स क्रू हे उपविजेते ठरले. तर विजय-चेतन या जोडीने तिसरा क्रमांक पटकावला. मायनस थ्री ग्रुपला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.