वाई : जिल्हा प्रशासन रोजच्या रोज रुग्णालयांच्या मागणीनुसार ३५ टक्के रेमडेसिवीर पुरवठा करीत आहे. रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत असल्याने राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाकडे वाटप सोपवलं आहे. मात्र, तरीही रेमडेसिवीरचा काळाबाजार होत असून, एका वॉर्ड बॉयलाच या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फलटण येथील सुविधा हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉय रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक अरुण गोडसे यांनी वॉर्ड बॉयला रंगेहात पकडले. वॉर्ड बॉय रेमडेसिवीरचे एक इंजेक्शन ३५ हजार रुपयांना विकत असल्याचे चौकशीतून समोर आलं आहे. या वॉर्ड बॉयला अटक करण्यात आली असून, पोलीस विभाग पुढील तपास करीत आहे. रेमडेसिवीर औषधाचा काळाबाजार करीत असल्याचे आढळल्यास त्याच्यावर जिल्हा प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने पुन्हा एकदा दिला आहे.

करोना संसर्गाने थैमान घातले असताना रेमडेसिवीर या इंजेक्शनचा काळाबाजार प्रकरणी फलटण पोलीस व अन्न विभागाने धडक कारवाई करत तिघांचे रॅकेट उध्वस्त केले आहे. यामध्ये सुविधा हॉस्पिटल फलटणचा वॉर्ड बॉय असून, या घटनेनं खळबळ उडाली आहे. सुनील कचरे, प्रवीण सापते, अजय फडतरे अशी संशयित आरोपींची नावे आहेत. यातील सुनील कचरे हा सुविधा हॉस्पिटल फलटणचा वॉर्ड बॉय आहे. याप्रकरणी अन्न व औषध विभागाचे निरीक्षक अरुण गोडसे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

करोना संसर्गामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू आहे. सातारा जिल्ह्यात याची माहिती समोर आल्यानंतर शनिवारी रात्री उशिरा यावर कारवाई करण्यात आली. तीन हजार रुपयांचे इंजेक्शन तब्बल ३५ हजार रुपयांना विकले जात होते. यामध्ये आणखी किती जणांचा समावेश आहे याचा तपास पोलीस करत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satara remdesivir injection ward boy arrested remdesivir shortage remdesivir black market bmh
First published on: 09-05-2021 at 15:28 IST