बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता म्हणजे जॉन इब्राहिम. तो सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. कधी त्याच्या आगामी चित्रपटांमुळे तर कधी त्याच्या खासगी आयुष्यामुळे. सध्या जॉनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो भर रस्त्यात एका मुलाच्या हातातून मोबाईल खेचून घेताना दिसत आहे. पण असे काय झाले की जॉनने चक्क फोन खेचून घेतला? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

व्हिडीओमध्ये एक मुलगा स्कूटीवर बसलेला दिसत आहे. तो त्याच्या मागून येणाऱ्या, जॉन इब्राहिमचा व्हिडीओ करत असतो. ते पाहून जॉन त्या मुलाच्या हातातील फोन खेचून घेतो आणि हाय बोलताना दिसतो. दरम्यान जॉनने काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. सध्या जॉनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून चर्चेत आहे.
आणखी वाचा : ‘जय भीम’मधील अभिनयाने सर्वांच्या डोळ्यात पाणी आणण्याऱ्या ‘संगिनी’ विषयी जाणून घ्या

व्हिडीओमध्ये जॉन ‘हाय, तुम्ही कसे आहात? तुम्ही ठिक आहात का? हे माझे मित्र आहेत’ असे जॉन बोलताना दिसत आहे. त्यानंतर जॉन मुलांना त्यांचा फोन परत देताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहेत. एकाने कमेंट करत जॉनची प्रशंसा केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जॉन इब्राहिमचा २०१८ रोजी ‘सत्यमेव जयते’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचा सीक्वेल ‘सत्यमेव जयते २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन मिलाप झवेरी करत असून जॉनसोबतच अभिनेता मनोज बाजपेयीदेखील स्क्रीन शेअर करणार आहे. तसेच दिव्या खोसला कुमार, मनोज बाजपेयी, अनूप सोनी, हर्ष छाया हेदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.